बॉईज २: धमाल मस्ती पुन्हा एकदा

बॉईज चित्रपटाच्या भरघोस यशानंतर चित्रपटाचे निर्माते बॉईज २ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. या शुक्रवारी बॉईज २ प्रदर्शित झाला आहे. बॉईज चित्रपटाप्रमाणे परत एकदा धिंगाणा घालण्यासाठी बॉईज सज्ज झाले आहेत व प्रेक्षकांच्या पसंतीससुद्धा पडलेले दिसत आहेत. हे बॉईज आता कॉलेजमध्ये असल्याने पहिल्यापेक्षा आता अधिक धमाल मस्ती करणार यात काहीच शंका नाही. ढुंग्या (पार्थ भालेराव), धैर्या (प्रतीक लाड) आणि कबीर (सुमंत शिंदे) हे तिघे मित्र बारावीत असून त्यांचे नऱ्या (ओंकार भोजणे) या सिनिअर सोबत चांगलेच वाकडे आहे. त्याच्यासोबत ढुंग्या आणि धैर्या यांची सतत भांडणे होत असतात. या सगळ्यांपासून दूर राहण्यासाठी कबीर बारावीच्या वर्षात हॉस्टेलला न राहायचे ठरवतो. पण कॉलेजमध्ये नव्याने आलेल्या चित्रा (सायली पाटील)च्या तो प्रेमात पडतो आणि तिच्यासाठी तो होस्टेलला राहायला येतो. पण कबीर, ढुंग्या आणि धैर्या यांचे नऱ्यासोबतचे वाद सुरूच असतात. त्यातूनच या सगळ्यांमध्ये एक पैज लागते. ही पैज पूर्ण करू न शकणाऱ्याला कॉलेज सोडून जावे लागेल असे ठरते. आता ही पैज काय आहे, या पैजेचा या मुलांच्या आयुष्यवर काय परिणाम होतो हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.

 

READ ALSO : मराठी चित्रपटातील सदाबहार गाण्यांची मैफल भाग 3

बॉईज २ हा चित्रपट अॅडल्ट कॉमेडी असल्याने यातील बरेचसे संवाद हे डबल मिनींगचे आहेत. आजच्या तरुण पिढीच्या दृष्टीकोनातून हा चित्रपट बनवला असल्यामुळे हे संवाद तरुण पिढीला भावणारे आहेत. हा चित्रपट अॅडल्ट कॉमेडी असला तरी दिग्दर्शकाने खास काळजीपूर्वक चित्रपट अश्लीलतेकडे झुकू दिला नाही. महाविद्यालयीन दशेतील तरुण तरुणींमधील खुन्नस व त्याचा एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यावर होणारा परिणाम या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाने रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे पण तो फारसा जमलेला नाही. सुमेध शिंदे, प्रतीक लाड आणि पार्थ भालेराव यांनी त्यांच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे.

बॉईज २ हा चित्रपट तरुणांच्या कलेने घेऊन त्यांना न रागावता गोष्टी कश्या पद्धतीने समजावता येतात हा संदेश नकळतपणे देऊन जातो. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते योग्यप्रकारे चित्रपटात दाखवले आहे. सध्या तांत्रिक आधुनिकतेमुळे सहज उपलब्ध झालेल्या इंटरनेट आणि त्यावर उपलब्ध असलेल्या पॉर्नसाईट, यांचा मुलांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हेदेखील या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण शेवट मात्र तितकासा भावत नाही. एखाद्या पॉर्नसाईटवर एखाद्या मुलीचा पॉर्न व्हिडिओ वायरल झाल्यावर तिच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो हे हव्या त्या प्रमाणात ठळकपणे अधोरेखित होत नाही.

चित्रपटात गिरीश कुलकर्णी, यतीन कार्येकर आदी कलाकरांच्या भूमिकाही आहेत पण त्याही अगदी मोजक्या दृश्यांमध्ये. बाकी चित्रपटात त्यांचा फारसा वावर नसला तरी त्यांच्या त्या भूमिका लक्षात राहतात. सिनेमागृहात जाऊन एकदा तरी पाहावा असा हा चित्रपट आहे.

फिल्मिभोंगा मराठी कडून या चित्रपटाला ५ पैकी ३ स्टार

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...