बकेट लिस्ट

“हिरवे हिरवे गार गालिचे” असं म्हणत भारतीय सिनेसृष्टीची ‘फुलराणी’ माधुरी घेऊन येत आहे तिचा पहिला मराठी चित्रपट ‘बकेट लिस्ट’. करण जोहर ही या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी  चित्रपट व्यवसायात पदार्पण करत आहे. परवा म्हणजेच ४ मे ला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या २ दिवसातच तब्बल ३७ लाख लोकांनी हा ट्रेलर पाहिलेला आहे. माधुरीने जी जादू हिंदी सिनेसृष्टीत पसरवलेली आहे,  तीच जादू घेऊन ती आता मराठीत उतरलीये… तितकीच लोभस जाणवणारी माधुरी.. तितक्याच सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना मोहून टाकण्यासाठी सज्ज झालेली आहे.

“आपल्याला ज्याने हृदय दिलं त्या व्यक्तीची बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी निघालेली एक गृहिणी”, अशा सुंदर संकल्पनेवर हा चित्रपट आधारलेला आहे. माधुरी यात नवऱ्याच्या आणि सासूच्या परवानगीशिवाय काहीही न करणारी सून, थोडी जुन्या विचारांची, पण तितकीच समंजस आई आणि भावनेला जास्त किंमत देणाऱ्या गृहिणीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. सईची बकेट लिस्ट पूर्ण करता करता स्वतःचा शोध घेणारी आणि सामन्याकडून असमान्याकडे जाणारी माधुरी पाहायला नक्कीच मजा येणार आहे.

माधुरीसोबतच सुमित राघवन, वंदना गुप्ते, रेणुका शहाणे, दिलीप प्रभावळकर, ईला भाटे, प्रदीप वेलणकर, मिलिंद फाटक आणि सुमेध मुद्गलकर यांसारख्या  मातब्बर कलाकारच्या हि प्रभावी भूमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटात रणबीर कपूरची हि एक झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

हिंदी चित्रपटसृष्टीत ३० वर्ष काम केल्यानंतर माधुरी मराठी चित्रपटामध्ये काम करणार आहे. मराठी चित्रपटांचा दर्जा आणि व्यवसाय पाहून करण जोहर सारखे निर्माते मराठी चित्रपटसृष्टीकडे वळू पहात आहेत. हि नक्कीच मराठी सिनेसृष्टीसाठी गौरवाची गोष्ट आहे. माधुरीची अदा, तीच नृत्य अनुभवणं हे जर तुमच्या बकेट लिस्टमध्ये असेल तर हा चित्रपट खास तुमच्यासाठी आहे. येत्या २५ मे ला हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तोपर्यंत खुश रहा.. फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.