जेव्हा आपले मराठी तारेच कोणासाठी सांताक्लॉज बनतात..! बघा कोणी कसा साजरा केला ख्रिसमस..

जेव्हा आपले मराठी तारेच कोणासाठी सांताक्लॉज बनतात..! बघा कोणी कसा साजरा केला ख्रिसमस..

जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल वे.. ही जिंगल सगळ्यांनाच आठवणींच्या गावात घेऊन जाते.. सांताक्लॉज, गिफ्ट्स, रेनडिअर स्लेज, मोजे, ख्रिसमस ट्री हे सगळं कसं अद्भुत वाटतं. कोणत्याही धर्माचे असो पण भारतात सगळेच सण मात्र उत्साहात साजरे होतात. ख्रिसमस ह्या पाश्चात्य सणाला सुद्धा भारतात आता सगळ्यांनीच ऍक्सेप्ट केलंच आहे. सगळेच जण आपापल्या परीने सणाची मजा घेतात. परदेशातल्या प्रमाणे भारतात बर्फवृष्टी होत नसली तरी ख्रिसमस डेकोरेशन आणि त्यावर कापूस डकवून स्नो चा परिणाम साधला जातो. ह्या सगळ्यात आपले सिनेसृष्टीचे तारे सुद्धा मागे नसतात हं.. आख्खं इन्स्टाग्राम सुंदर सजवलेले ख्रिसमस ट्री, लाल कपडे, आणि सांताक्लॉज ची टोपी घालून काढलेल्या फोटोनी भरलेलं दिसेल. फेसबुक तर आपल्याला आपल्या आवडीच्या कलाकारांचे त्यांच्या घरातल्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे अपडेट देत राहतं..

 

READ ALSO :  फॉरेन रिटर्न नाही आमच्याकडे येतोय डोंबिवली रिटर्न.. लवकरच…

प्रत्येक जण ह्या नाताळचे आणि त्या नंतर येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेले दिसतात. काही सेलेब्रिटी तर स्वतःच सांताक्लॉज बनून कोणाच्या तरी आयुष्यात आनंद आणायचा प्रयत्न करतात. काहीसे असेच केलेय आपल्या अमृता खानविलकरने. ठाण्यातील जागृती पालक संस्थेला भेट देऊन तिने तेथील गतिमंद मुलांसोबत ख्रिसमस साजरा केला. ती स्वतः सांता बनून त्या मुलांशी खेळली आणि त्यांना भेटवस्तूही दिल्या. आशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत तिने सणाची मजाही लुटली. त्या मुलांनी देखील तिला भरभरून प्रेम दिले आणि तिचा आनंद द्विगुणीत केला

श्रेयस आणि दीप्ती तळपदे ह्यांना देखील हा ख्रिसमस एक नवीन आनंद देऊन गेला. सरोगसी मधून झालेल्या त्यांच्या बाळाबरोबर त्यांनी तिचा पहिला वहिला ख्रिसमस साजरा केला. आद्याला रोषणाई आवडते म्हणून तिच्यासाठी त्यांनी ख्रिसमस ट्री ची आरासही घरी केली. नवीन आई बाबांनी आपल्या गोंडस मुलीबरोबर घरीच ख्रिसमसची मजा लुटली.

सोनाली कुलकर्णी (प्रथम) ही ख्रिसमस साठी कुर्ग ला गेली असून तिने नुकताच इन्स्टाग्राम वर आपल्या फॉलोवर्स आणि फॅन्सना शुभेच्छा देणारा व्हीडिओ टाकला आहे. सोनाली कुलकर्णी (द्वितीय) ही तर प्रीख्रिसमस सेलिब्रेशन साठी दुबई ला गेली आहे. तिकडे थरारक स्काय डायविंग चा रोमांचकारी अनुभव तिने घेतला. अर्थात दुबईतच असल्याने तिचा ख्रिसमस देखील जोरदार असणार

आता ख्रिसमस नंतर ख्रिस्ती नवीन वर्षाच्या आगमनासाठी सगळेच आतुर झाले असणार आणि ह्या सगळ्या अभिनेत्यांची मज्जा आपल्याला लवकरच बघायला मिळणार आणि त्यांच्या अपडेट्स साठी फिल्मीभोंगावर विझिट द्यायला विसरू नका..!

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author