कोमेडीचे बादशाह, ह्यांचे नाव घेताच आठवतात असंख्य मजेदार फिल्मी सीन्स..!!

कोमेडीचे बादशाह, ह्यांचे नाव घेताच आठवतात असंख्य मजेदार फिल्मी सीन्स..!!

 

२०१९ च्या पहिल्याच दिवशी ‘कादर खान’ यांना देवाज्ञा झाल्याची संपूर्ण बॉलिवूडवासीयांच्या कानावर दुःखद बातमी धडकली आणि जो तो त्यांच्या आठवणीत हरवून गेला. खरंच खरा किंग खान कोण असेल तर ते होते कादर खान. साधारण १९७५ ते १९९५ च्या काळात कादर खान हे नाव बॉलिवूड मध्ये चांगलेच गाजत होते. स्वतः पटकथा लिहून कित्येक सुपरहिट सिनेमे कादर खान यांनी बॉलिवूडला दिलेले आहेत. त्यांची पहिली जोरदार जोडी जमली ती अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन बरोबर. अमिताभच्या खात्यातले हम, सुहाग, याराना, नसीब, मुकद्दर का सिकंदर, शराबी, मिस्टर नटवरलाल, अमर अकबर अँथॉनी, गंगा जमुना सरस्वती, खून पासीना हे सगळे सुपर डुपर हिट चित्रपट लिहिले आहेत कादर खान यांनीच. लहानपणी गरिबीत काढलेला हिरो मोठा होऊन कसा जुलमी जमान्याशी लढतो अश्या आशयाचे त्यांचे सिनेमे कायम खूप गाजले.

 

 

READ ALSO :  वेबसिरीज क्षेत्रातही रोवला मराठी झेंडा.. पहा कोण कोण गाजवतायत आपले नाव हिंदी आणि मराठी वेबसिरीज मध्ये

स्वतः आयुष्य अत्यंत गरिबीत काढल्याने आणि स्वतःच्या आईला आजारपणामुळे गमावल्याने कादर खान तरुणपणातच खूप खचलेले होते पण पुढे नाटक आणि सिनेमा क्षेत्रात येऊन त्यांनी भरपूर नाव आणि पैसे कमावले. त्यांच्या सिनेमांची खासियत अशी की त्यातील डायलॉग खूप धमाकेदार असायचे. चित्रपट पाहून प्रेक्षक बाहेर पडले की त्यांच्या तोंडी एकेक डायलॉग कित्येक महिने असायचे. कादर खान हे फक्त लेखक नसून ते स्वतः कलाकारसुद्धा होते आणि अत्यंत ताकदीचा अभिनय ते सहज करायचे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. गोविंदा आणि कादर खान ह्यांची केमिस्ट्री म्हणजे लोकांसाठी हास्यलॉटरीच होती.. त्यांचे सगळे चित्रपट म्हणजे रसिकांसाठी पर्वणी. कुठलेही टेन्शन असो त्यावर हमखास रामबाण उपाय म्हणजे कादर खान – गोविंदा ह्यांच्या चित्रपट..!! फक्त अमिताभ आणि गोविंदाच नाही तर त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्याबरोबर कादर खान ह्यांची भट्टी चांगलीच जमायची. लहान मुळापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत असा त्यांचाही चाहता वर्ग होता. १९८० ते २००० मधले त्यांचे सिनेमे अजूनही टीव्ही वर लागल्यास त्यांचे चाहते आवर्जून बघतात

विनोदी भूमिकांबरोबर, चरित्र भूमिकाही कादर खान ह्यांनी खूपच छान रंगवल्या. इतकेच नाही तर खलनायक म्हणून सुद्धा त्यांनी कित्तेक चित्रपट गाजवले. पण ते रसिकांच्या मनात एक विनोदवीर म्हणून जास्ती लक्षात राहतील हे नक्की. जितके ते एक अभिनेते म्हणून लक्षात राहतात तितकेच ते एक भन्नाट डायलॉग लेखक म्हणून देखील लक्षात राहतात. उर्दू मिश्रित त्यांचे मोठे मोठे डायलॉग असो की मजेदार हलके फुलके डायलॉग पण रसिकांची दाद सगळ्यांनाच सारखी मिळत गेली. ३०० हुन जास्ती सिनेमात काम करून त्यांनी आपल्या अदाकारीच्या वेगवेगळ्या छटा दाखवून दिल्या. गेले काही वर्षे आजारपणामुळे मात्र त्यांनी बॉलिवूडला रामराम ठोकला आणि शेवटी आजारपणाला शरण जाऊन आयुष्याला..!! त्यांच्या जाण्याने बॉलिवूडचा एक मोठा सितारा निखळला आहे. सगळ्या दिग्गजांनी त्यांच्या एक्सिट बद्दल खंत व्यक्त केली आहे. तब्बल दोन दशके आम्हाला सगळ्यांना आपल्या अभिनयाने हसू तर कधी असू देणाऱ्या ह्या उत्तम अभिनेत्याला फिल्मीभोंगा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..!!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author