गावरान हास्य कलाकारांना मिळणार संधी ‘हसुदेव’ होण्याची

गावरान हास्य कलाकारांना मिळणार संधी ‘हसुदेव’ होण्याची !

भारतात stand-up कॉमेडीला मान मिळवून दिला तो म्हणजे लाफ्टर challenge या कार्यक्रमाने. त्यानंतर अशाप्रकारच्या कार्यक्रमांना उधाण आलं. पण कोणीही ग्रामीण बाजाचा कार्यक्रम बनविला नाही. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत फक्त शहरी विनोदच पोहोचला. फिल्मीभोंगा या मुंबईस्थित मनोरंजन क्षेत्रातील वेबसाईटने ‘गावरान कॉमेडी’ प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, यासाठी ‘हसुदेव’ नावाच्या एका ‘stand-up कॉमेडी स्पर्धेचं’ आयोजन केलेलं आहे. हि स्पर्धा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणाऱ्या हास्य कलाकारांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांना एक हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी घेण्यात येणार आहे.

या स्पर्धेची नांदी १५ जुलै २०१८ रोजी सातारा येथून होणार आहे. स्पर्धेची वेळ आहे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत व स्थळ आहे, श्री शाहू कला मंदिर, शुक्रवार पेठ,  सातारा. या स्पर्धेसाठी स्पर्धकांना त्यांनी स्वतः बनविलेले विनोद किंवा हास्यकृती ३ ते ५ मिनिट या वेळेत सादर करायच्या आहेत. तुम्ही उत्तम विनोद लिहू शकत असाल, तुम्हाला काही घटना किंवा माणसांचे स्वभाव विनोदी पद्धतीने सांगता येत असतील, तुम्हाला नट-नट्यांच्या किंवा राजकीय लोकांच्या नकला करता येत असतील, तुम्ही हास्यकविता लिहू शकत असाल किंवा कोणत्याही पद्धतीने तुम्हाला लोकांना हसविण्याची कला अवगत असेल तर हसुदेव या स्पर्धेत नक्की सहभागी व्हा. या स्पर्धेत शुद्ध मराठी बोलीचा अट्टाहास करण्यात आलेला नाही. तुम्ही तुमच्या भाषेत तुमची कला सादर करू शकता. या स्पर्धेची tagline आहे, “गावरान कॉमेडीचा मॉडर्न अवतार”. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल कि आयोजकांना नवीन विषय ग्रामीण बाजामध्ये अपेक्षित आहे.

       कित्येक स्पर्धकांच्या मनात हा हि प्रश्न आला असेल कि या कार्यक्रमाला ‘हसुदेव’ हेच नाव का देण्यात आलं ? तर धर्म नीतीच्या गोष्टी सांगुन ज्यांनी महाराष्ट्रातील जनतेची जनजागृती केली अशा ‘वासुदेव’ नामक लोककलाकारांना आपल्या समाजात मानाचं स्थान आहे. तशाच पद्धतीने लोकांना त्यांचं दुखः विसरून हसायला लावण्याचं समाजकार्य करण्याच्या हेतूने ‘हसुदेव’ हि संकल्पना राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या स्पर्धकांना ‘हसुदेव’ हा बहुमान मिळणार आहे.

‘हसुदेव- गावरान कॉमेडीचा मॉडर्न अवतार’ या स्पर्धेसाठी ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी करण्यासाठी https://goo.gl/forms/SrU5savALtCmPRz52 या लिंकवर जाऊन

फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे १३ जुलै २०१८. जर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी करण्यास जमणार नसेल तर तुम्ही श्री शाहू कला मंदिर येथे १३ व १४ जुलै रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजे या वेळेमध्ये प्रत्यक्षात येऊन नावनोंदणी करू शकता. अधिक माहितीसाठी ८६५५५४२४५८ या व्हाट्सअप्प नंबरवर संपर्क करा.

या स्पर्धेच्या अटी व नियम
१. हसुदेव हि Stand-Up Comedy स्पर्धा आहे.
२. या स्पर्धेसाठी वयाचे कोणतेही बंधन नाही.
३. स्पर्धेसाठी ऑनलाइन नावनोंदणीची शेवटची तारीख १३ जुलै २०१८ आहे.
४. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी १३ जुलै व १४ जुलै २०१८ रोजी शाहू कला मंदिर, सातारा येथे प्रत्यक्ष येऊन नाव नोंदणी करता येऊ शकेल.
५. दिनांक १५ जुलै रोजी स्पर्धकांना आपली कला सादर करावी लागेल आणि त्याच दिवशी आपला पहिला हसुदेव म्हणजेच विजेता घोषित करण्यात येईल.
६. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
७. वरील अटी व नियमांमध्ये बदल करण्याचा अधिकार फिल्मिभोंगाला असेल व तो सर्वांवर बंधनकारक असेल.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.