दोन मेंदू आणि त्यात बुद्धीचा अर्क काढून भरलेला असला भन्नाट माणूस, पण दिसायला येडा गबाळा, तुम्ही बघितलाय?? हो बघितला. तर मग सांगा कीsssss कोण?

दोन मेंदू आणि त्यात बुद्धीचा अर्क काढून भरलेला असला भन्नाट माणूस, पण दिसायला येडा गबाळा, तुम्ही बघितलाय?? हो बघितला. तर मग सांगा कीsssss कोण?

 

दोन मेंदू , हो.. एका मेंदूचं काम शब्द साठवायचे आणि दुसऱ्या मेंदूचं काम त्या शब्दांचा कीस करायचा आणि त्यांना वेगवेगळ्या साच्यात घालून पुन्हा वेगळे आकार द्यायचे, रंग द्यायचे, अर्थ पण द्यायचे, म्हणजे मराठी भाषेवर केवढी सत्ता पाहिजे? येड्या गबाळ्याचं काम नाही ते… पण हा येडा गबाळा ते काम सटासट करायचा.. इतका सटासट की समोरचा आss वासून त्याच्याकडं बघतंच बसायचा. तो पर्यंत हा दुसऱ्या कामात बिझी व्हायचा.ह्या येड्या गबाळ्या चं डोकं म्हणजे येकदम पावर फुल. आणि त्याची आई बिचारी, गरीब, साधी, सरळ, भोळी, भाबडी. पण अख्या गावाच्या तक्रारी हिच्याकडं, आज तुझ्या पोरानं असं केलं, तुझ्या पोरानं फसवलं, तुझ्या पोरानं हे फोडलं, तुझ्या पोरानं काय केलं ते कळलंच नाई. असलं हे पोर अख्या गावाला येडं करायचं.  ह्याचा चेहेरा म्हणजे निरागस गायीच्या वासरा सारखा, काहीही केलं तरी माफ. ह्या माफीचं कारण काय होतं माहितीये? दुसऱ्या मेंदूचा अफलातून खेळ. एकाच शब्दाचे दोन अर्थ वापरून हा समोरच्यालाच  नाही,   तर आपल्याला सुद्धा येडं करायचा. आता कळलं असेल तुम्हाला कोण होता हा अफलातून अवलिया. “दादा  कोंडके”. गरीब गाईसारखा निरागस चेहेरा, ढगळ बंडी आणि खाली लोंम्बत्या नाडीची हाफ पॅन्ट, घरातून बाहेर सुटला की तोंड पण सुटायचं ह्याचं. बुद्धीचा अर्क तोंडातून बाहेर पडायचा. समोरचा नुसता ऐकायचा , नंतर त्याला कळायचं हा तर आपला बाप निघाला!!!!.

‘हजरजबाबी’ उत्तर ज्याच्या सुपीक डोक्यातून बाहेर यायचं  तो हजरजबाबी  अभिनेता म्हणजे ” दादा कोंडके” प्रत्येक वाक्यात दोन अर्थ लपलेले असायचे. त्यामुळे त्यांच्या सिनेमाची नावं सुद्धा दोन अर्थाची (dubble meaning) असायची. “मुका घ्या मुका”, “बोट लावीन तिथं गुदगुल्या” अहो ह्या दादांची दादागिरीच असली होती की सेन्सॉर बोर्डाचे अधिकारीच घाबरायचे दादा कोंडके चा सिनेमा सेन्सॉर करायला. हे वाक्य नको हे काढून टाका असं ते दादा कोंडकेंना म्हणाले तर दादा कोंडके म्हणायचे तुम्ही उलटा अर्थ काढू नका , सरळ अर्थ काढा म्हणजे ते वाक्य तुम्हाला चांगलं वाटेल हो. आणि हे अधिकारी गप गुमान चांगला अर्थ घेऊन सेन्सॉर पास करायचे दादांचे चित्रपट. दुसरे आणखी काही लोक घाबरायचे दादा कोंडकेच्या नवीन पिक्चरला, कारण हाऊस फुल्ल चालायचे हो हे पिक्चर, चाळीस चाळीस आठवडे एकच पिक्चर, आणि ते ही हाऊस फुल्ल. आता राज कपूर, देव आनंद , विजय आनंद, असले मोठे हिंदी सिनेमा वाले त्यांचे नवीन पिक्चर दादा कोंडकेंचा पिक्चर चालू असेल तर त्यांचा नवीन पिक्चर  रिलीज करायची तारीख पुढं ढकलायचे.  कारण घाबरायचे हे सगळे दिग्गज. राज कपूर यांनी तर त्यांच्या “बॉबी ” ह्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. दादांचा “सोंगाड्या” ३७ आठवडे मुंबईत मुक्काम ठोकून होता. लावलेली पोस्टर्स १०/१० महिने उत्तरायचीच नाहीत. म्हणून हे मोठे हिंदी पिक्चर वाले दादांच्या नवीन चित्रपटांचा आधी अंदाज घ्यायचे, आणि नंतरच आपले चित्रपट रिलीज करायचे. अशी होती ‘दादांची दादागिरी’.

 
 

READ ALSO :  मर्डर पण परफेक्ट असतो बर का..!! आणि तो होणार लवकरच रंगमंचावर..!

“दादा कोंडके” म्हणजे अफलातून. कसे? त्यांचे एवढे चित्रपट हाऊस फुल झाले की ‘गिनीज बुक मध्ये त्याची नोंद झाली. ८ऑगस्ट १९३२ मध्ये नायगवच्या कामगार चाळीत जन्मलेले दादा कोंडके  “विच्छा माझी पुरी करा” ह्या नाटकातून मोठे झाले, आणि नंतर विनोदी चित्रपटांचे  ‘सम्राट’ झाले. भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती ‘ ह्या पहिल्या चित्रपटात त्यांनी कामाची सुरुवात केली. नंतर , एकटा जीव सदाशिव, पांडू हवालदार, सोंगाड्या, मुका घ्या मुका, बोट लावीन तिथं गुदगुल्या, असले ९ चित्रपट आले आणि सगळे कमीतकमी २५आठवडे चालले. आशा ह्या अफलातून अवलीयचा हात कुणी धरलाच नाही.अशा ह्या येड्या गबाळ्या, दोन मेंदूतून दोन अर्थ काढणाऱ्या  मराठी  विनोदाच्या बादशहाला फिल्मी भोंगाचा सलाम……

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author