मराठी सिनेसृष्टीतील विनोदाचा बादशाह हरपला .

मराठी चित्रपटामध्ये आपल्या विनोदाने सर्व रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारी विनोदाचा बादशाह  आज आपल्या सर्वाना सोडून गेला. ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांना फुफ्फुसाचा आजार होता. मुंबईतल्या मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उत्तम अभिनय शैली आणि अप्रतिम विनोद बुद्धीने प्रेक्षकांची मन जिंकणारे आणि प्रेक्षकांना त्यांचा विनोदाने खळखळून हसवणारे जेष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण, त्यांनी १९८५ साली प्रदर्शित झालेल्या “वाहिनीची माया “ या मराठी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यांनी आजवर जवळपास ३५० ते ४०० चित्रपटामध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांच्या काही मुख्य गाजलेल्या भूमिका मध्ये झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत, जत्रा, घोळात घोळ, आली लहर केला कहर, माहेरची साडी, येऊ का घरात या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या व प्रेक्षकांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला. त्यांनी मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहे, आणि त्यांची वेगळी छाप निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी काही मराठी मालिकांमध्ये त्यांनी अप्रतिम भूमिका साकारल्या आहे. त्यापैकी  रानफूल, लाइफ मेंबर या मालिकाही गाजल्या.

 

READ ALSO : लग्न म्हणजे बंधन वाटणाय्रा सर्व तरुण तरुणींसाठी ही मेजवानी

मराठी चित्रपट, मालिकाप्रमाणे त्यांनी मराठी नाटकातही उत्तम अभिनय करत काही विशेष भूमिका अजरामर केल्या आहेत , त्यातील त्यांची ‘मोरुची मावशी’ या नाटकातील त्यांचं स्त्री पात्र लोकप्रिय ठरलं. ‘मोरूची मावशी ‘हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेलं नाटक ठरलं,  श्रीमंत दामोदर पंत हे ही नाटक खूप लोक प्रिय झाले. त्यांनी त्यांचा अभिनय कौशल्याने सहाय्यक अभिनेत्याला एक वेगळी ओळख  निर्माण करून दिली आहे. जो चित्रपटामध्ये दुर्लक्षित असतो त्या व्यक्तिरेखेला त्यांनी मनाचे स्थान निर्माण करून दिले आहे. त्यांच्या विनोदाला काहीच तोड नाही, असा विनोदाचा बादशाह पुन्हा होणे नाही. संपूर्ण चित्रपटसृष्टी भावुक झाली आहे.

काही महिन्यापूर्वीच त्यांना व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१७ च्या ‘संस्कृती कलादर्पण’ च्या जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले. नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान त्यांना पाहिले तेव्हा त्यांची परिस्थिती नाजूक होती. अशातच आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी आली , अगदी मन हेलावून गेले. माझे आवडते विनोदी अभिनेते आज आपल्यात नाही , ही कल्पनाही करवत नाही.

आपल्या लाडक्या मोरूच्या मावशीला भावपूर्ण श्रद्धांजली

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...