सज्ज व्हा सायकल स्वारीला

सज्ज व्हा सायकल स्वारीला

चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कलाकार वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, विविध वृत्तपत्रांच्या कार्यालयांना भेटी देतात. सायकल या चित्रपटाच्या चमूने देखील अशाच प्रकारे लोकसत्ता या वृत्तपत्राच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे आणि लेखिका आदिती मोघे हे दोघेउपस्थित होते.चित्रपटात प्रमुख भूमिका असलेले ऋषिकेश जोशी, भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव यांच्यासह दीप्ती लेले आणि बालकलाकार मैथिली ही देखील प्रसिद्धी साठी उपस्थित होती.

सायकलकथानक

सायकल ची कथा कोकणातील लहानशा गावात राहणाऱ्या केशव ची आहे.केशव च त्याच्या सायकल वर अतीव जीव असतो आणि गावात आलेले दोन चोर ती सायकल चोरतात आणि त्यातून पुढे सायकल हा चित्रपट घडत जातो. चोर त्या सायकलची चोरी का करतात? आणि केशव ला त्याची सायकल परत मिळते का?या प्रश्नांच्या उत्तरांचा उलगडा ४मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या सायकल या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर होणार आह. हॅपी माइन्ड्स एंटरटेनमेंट चा सायकल हा चित्रपट व्हायकॉम १८मोशन पिक्चर्स ने प्रस्तुत केला आहे.

विविध प्रतिक्रिया

दिग्दर्शक प्रकाश कुंटे हे चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले की सायकल ही प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची कथा असून एखाद्या घडलेल्या घटनेच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळे मांडण्याचा प्रयत्न  त्यात करण्यात आला आहे.

लेखिका आदिती मोघे म्हणाल्या की सायकल ची कथा त्यांना त्यांच्या वडीलांमुळे सुचली. आपण आपल्या जवळच्या माणसाप्रमाणे ज्या वस्तूवर प्रेम करतो, जीव लावतो ती वस्तू जर चोरीला गेली तर काय होईल,हे सायकल मध्ये वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

अभिनेते ऋषिकेश जोशी यांची चित्रपटात प्रमुख भूमिका दिसून त्यात ते ज्योतिषी झालेले पाहायला मिळतील. आधी पोस्टमन विषयी असलेली ही कथा ज्योतिषाची झाली.वेगळा विषय, आशय असलेल्या चित्रपटांचे आपल्याकडे स्वागत होते , असे म्हणत ऋषिकेश जोशी यांनी अजून एक गोष्ट सांगितली की एखादा गंभीर विषय उपहासात्मक किंवा तिरकसपणेमांडला की प्रेक्षकांपर्यंत तो जास्त चांगल्या प्रकारे पोहोचतो. भाऊ कदम चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले की सायकल चित्रपटातील भूमिका त्यांच्या आजवरच्या प्रतिमेला आणि शैलीला छेद देणारी आहे.ही वेगळी प्रकारची ब्लॅक कॉमेडी आहे.आपण असाही अभिनय करू शकतो हे भाऊंना या चित्रपटाच्या माध्यमातून कळले.प्रियदर्शन जाधव यांनी सांगितले की चित्रपटात ते स्वतःआणि भाऊ हे दोघे चोराच्या भूमिकेत आहेत.प्रियदर्शन जाधव याला ब्लॅक कॉमेडी करायला जास्त आवडते. चोरीला गेलेल्या सायकलीचा कुटुंबावर झालेला परिणाम यातून मांडला आहे.कसलेल्या अभिनेत्यांबरोबर काम करायचे असल्याने दडपण होते .पण सर्वांनी सांभाळून घेतले.चित्रपटातील बालकलाकार मैथिलीला चित्रीकरणप्रसंगी फार धमाल माजा मस्ती करण्यास मिळली त्यामुळे चित्रीकरण करतोय असे तिला कधीच वाटले नाही.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Crisenta Almeida

"Crisenta Almeida is a seasoned writer who goes by the description, WRITER BY DAY. READER BY NIGHT. She has been a writer with the content industry for a good number of years, which inspired her to start her content agency. Madly in love with storytelling, she knows how to weave a tale."