आता पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार डॅडींचा थरार.. येतोय दगडी चाळ भाग २…!!

आता पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार डॅडींचा थरार.. येतोय दगडी चाळ भाग २…!!

चुकीला  माफी नाही“, खाड करून कानाखाली आवाज निघायचा, कारण ह्या मराठी डॉन ला कुणी चूक केलेली खपत नाही. हा डॉन एकदम खतरनाक, ह्याचा पंगा होता फक्त दाऊद गँग बरोबर. का घेतला पंगाआमच्या आजूबाजूच्याच पोरांना पैशाचं आमिष दाखवून हा दाऊद त्यांच्याकडून आमच्याच देशात गोंधळ माजवतो, बॉम्ब स्फोट करतो, आणि काम झाल्यावर खलास करून टाकतो. असला पैशाचा माज ह्या मराठी डॉननं कधी खपवून नाही घेतलाआपल्या आईला आपल्या घरासाठी खर्च भागवायला नोकरी करायला लागते म्हणून हा स्वतः नोकरीला लागला. लोकांना आपलं म्हणत होता, वेळेला उपयोगी पडत होता, अडीअडचणीला धावून जात होता, कुणाचं काय तर कुणाचं काय, सगळ्यांशी आपुलकीने वागून प्रेम मिळवत होता, प्रेम करत होता. एक भला माणूस म्हणून सगळ्या लोकांत मिळून मिसळून राहत होता. वडिलांचा दुधाचा व्यवसाय, पण त्यातून भागत नव्हतं म्हणून आई पण नोकरी करायची, पण पैसा जास्त मिळवला पाहिजे म्हणून हा नोकरीला लागला. 70 /80 च्या दशकात दाऊद स्मगलिंग करून अमाप पैसा मिळवत होता आणि त्यावेळी तो पैशाच्या जोरावर चिंचपोकळी, भायखळा इथल्या तरुण पोरांना पैसे फेकून वापरून घ्यायचा, आणि काम झाल्यावर हाकलून द्यायचा, नाहीतर खलास करायचा. हो गोष्ट मराठी डॉन  म्हणजेच “”अरुण गवळी“” च्या कानावर आली आणि दाऊदच्या विरोधात ह्या आपल्या गल्लीतल्या पोरांसाठी त्याने पंगा घेतला. स्वतःचीच एक मोठी गँग बनवली आणि  सुरू झालं मुंबईतलं टोळी युद्ध..

पणअरुण गवळीदाऊदच्या देश विरोधी कारवायांविरुद्ध उभा ठाकला. त्याला पळवून लावण्यासाठी जीवाचं रान केलं. पैसे कमी पडत होता म्हणून काही अवैध धंदे पण गवळी गँगने सुरू केले. त्यात कोणी आडवा आला तर त्याला संपवला

 

READ ALSO :  फॉरेन रिटर्न नाही आमच्याकडे येतोय डोंबिवली रिटर्न.. लवकरच…

अरुण गवळीच्या अड्डा म्हणजेदगडी चाळ“. सगळे टरकून होते ह्या दगडी चाळीला. वचकच होता तसा. दाऊदला मुंबईतून पळवून लावला अरुण गवळी गँगने. दाऊदचा एक जवळचा नातलग अरुण गवळी गँगनं संपवला. ८०/९० ह्या काळात आणखी दोन खून अरुण गवळी गँग कडून झाले, त्याच वेळी टाडा कायद्याखाली अरुण गवळीला ९वर्ष तुरुंगात जावं लागलं, पण ह्या डॉनवर  ‘लोकांनी प्रेम केलं.’  तुरुंगात जाण्यापूर्वी हा डॉन लोकांमध्ये मिळून मिसळून राहायचा, लोकांची अवघड कामं कधी प्रेमाने तर कधी दहशत दाखवून करून घ्यायचा. म्हणून त्याला लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलं, खून केलेला डॉन पण सामान्य लोकांचा जिवाभावाचा मित्र अशी त्याची प्रतिमा तयार झाली आहे.  

म्हणून ह्या डॉनच्या अनेक घटनांवर दोन चित्रपट काढले गेले. एक मराठीदगडी चाळनावाचा आणि एक हिंदीआता ह्याच खतरनाक , पण लोकप्रिय डॉन वर तिसरा चित्रपट सुद्धा येतोय. तोच दिग्दर्शक ह्या नवीन चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. त्याचं नाव आहे  अजूनही दहशत असलेली  “”दगडी चाळ “” आधीच्या चित्रपटात काही चित्रित झालेल्या घटना असतील किंवा काही माहिती नसलेल्या गोष्टींचा ह्या चित्रपटात उलगडा केला असेल. नवीन   कायकाय असणार , कलाकार कोण असणार, हे अजून गुलदस्त्यातच आहे पण जनमानसात चांगली प्रतिमा आणि अंडरवर्ल्ड मध्ये दहशत असलेल्या ह्या खतरनाक/प्रेमळ डॉन बद्दल आणखी काही जाणून घ्यायला मराठी रसिक प्रेक्षकांना निश्चितच आवडेल. नवीन वर्षात येतोय  त्या  पाहिलेल्या अनुभवलेल्या अंडरवर्ल्ड जगतातल्या थरारक घटना समोर उभा करणारा  हा  “दगडी चाळपहाच हा मराठी खतरनाक डॉनअरुण गवळीआजही तुरुंगात शिक्षा पूर्ण करतोय. पांढरा स्वच्छ पायजमा, पांढरा स्वच्छ सदरा, आणि पांढरी स्वच्छ टोपी, असा पेहेराव, जमिनीवर चालणारा पण दाऊदला  घराच्या बाहेर पडू देणारामुंबईचा मराठी डॉन‘. राहणार  ‘दगडी चाळ‘. मुंबई.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author