१०वीच्या परीक्षेचा बागुलबुवा पळवायला येतोय नवीन चित्रपट ‘१०वी’

१०वीच्या परीक्षेचा बागुलबुवा पळवायला येतोय नवीन चित्रपट ‘१०वी’.. ८ फेब्रुवारीला होणार पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश..!!

आयुष्यातील पहिली मोठी परीक्षा म्हणजे १०वीची परीक्षा.. तसे बघायला गेलं तर प्रत्येक परीक्षेसाठी मुलं भरपूर अभ्यास करतात. एसएससी म्हणजेच १० वी च्या परीक्षेला नेहमीपेक्षा अधिक जोमाने अभ्यास करावा लागतो. १० वी म्हणजे आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ‘शिक्षित’ असा शिक्का बसतो. हल्ली १० वी ला प्रचंड महत्व आले असून विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत ही परीक्षा अत्यंत महत्वाची पायरी समजली जाते. पण पालक मात्र स्वतः ही टेन्शन घेतात आणि त्या पाल्यावर ही खूप टेन्शन लादतात. ‘यंदा १०वीला आहे’ ह्याचे च कौतुक सगळीकडे.. क्लासेस काय, खाजगी शिकवण्या काय अगदी क्रॅश कोर्स सुद्धा मुलांना करावा लागतो. एखाद्या छोटेखानी कौटुंबिक कार्याला लागणारे बजेट इयत्ता १०वी वर खर्च होते. आणि ह्या सगळ्या मागे असते पालकांची एकच इच्छा.. कधीही मिळालेले असो वा नसो पण आपल्या मुलाने/ मुलीने १०वीत मात्र ९०% टक्क्यांच्या वर जावे.

१० वी चे इतके टेन्शन आणि बाहेर जोरदार स्पर्धा असल्यामुळे मुलांना सतत अभ्यासाला लावणारे पालक सर्वत्र पाहावयास मिळतात. खरंतर ही परीक्षा महत्वाची असली तरी त्यासोबत येणारा मानसिक तणाव पालक आणि पाल्यांच्या मनावर आघात करून जातो हे कितपत योग्य आहे? अशाच मुलांच्या आणि पालकांच्या मनोस्थितीवर भाष्य करणारा एक मराठी चित्रपट येतोय ज्याचे नावही आहे ‘१० वी’. हा चित्रपट प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासोबत बघणे गरजेचे आहे. तसं पाहायला गेलं तर हा राष्ट्रीय प्रश्न बनलेला आहे त्यामुळे हा चित्रपट अमराठी भाषिक प्रेक्षकांचेही डोळे उघडणारा ठरू शकेल. जरी १० वी ची परीक्षा हा विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील मैलाचा दगड असला तरीही त्यावेळी येणाऱ्या टेंशन्सचा व कदाचित त्यातून येणारा नैराश्याचा कसा सामना करता येऊ शकेल यावर उहापोह १० वी’ चित्रपटातून करण्याचा प्रयत्न झाला आहे. दर वेळेला इतके प्रेशर घेऊनच १० वीला पार केले पाहिजे असे काहीही नसते. अनेक अप मार्ग ही असतात जेणे करून हे वर्ष विद्यार्थ्यांना बागुलबुवा वाटणार नाही. ह्या चित्रपटातून असेच काहीसे सुचवायचे असणार

 

READ ALSO :  सिड-मिट च्या प्रेमाचे साखरपुड्यात रूपांतर. लवकरच अडकणार लग्नाच्या बंधनात..!!

या चित्रपटाची कथा, पथकथा आणि संवाद मयूर राऊत आणि पियुष राऊत यांचे असून या दोघांनीही या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. निर्माते सुधीर जाधव यांनीच ‘१० वी’ प्रस्तुतसुद्धा केला आहे. रविराज पवार व आकाश पवार यांच्या गीतांवर संगीतसाज चढविला आहे. ह्या चित्रपटाचे पोस्टर पाहिले असता हे ध्यानात येते की सर्व कलाकारांचे चेहरे लपविले आहेत. थोडक्यात सर्वच कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेऊन निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता ताणली निश्चित आहे. लेखक दिग्दर्शकांच्या मते हा चित्रपट विद्यार्थी आणि त्यांच्या मानगुटीवर बसणाऱ्या त्यांच्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारा असेल. सिरीयस विषय असला तरी तो चित्रपटातून हसत-खेळत मांडण्यात आला आहे. पालक आणि पाल्यांच्या १० वीच्या प्रेशरचा खात्मा करण्यासाठी ‘१० वी’ ८ फेब्रुवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author