सहा दशकं प्रेक्षक होते ह्या हिरोच्या अदांवर फिदा..

सहा दशकं प्रेक्षक होते ह्या हिरोच्या अदांवर फिदा..

हा एक सदाबहार अभिनेता होता. पण आपलं नशीब अजमावण्यासाठी तो जेंव्हा मुंबईत आला तेंव्हा त्याच्या खिशात होते ३० रुपये. कारण त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी त्याचे वडील पैसे खर्च करू शकत नव्हते. पुढचे शिक्षण त्याला स्वतःच्या हिमतीवर करायचे होते.

कॉट बेसिसवर एका गेस्ट हाऊसवर उतरला आणि बॉलिवूड अभिनेता होण्याची स्वप्न पाहायला सुरुवात केली. 

पण स्वप्न साकार व्हायला मार्ग सुकर असेल तरच झटपट पुढे जाता येतं ना. मार्गात अनेक अडथळे येतात हे त्या मार्गावर चालायला लागल्यावरच कळायला लागते नाsss

मग चालू होतो ‘संघर्ष’.तसाच संघर्ष ह्या हिरोच्याही वाट्याला आला. हा काळ होता १९४३ चा.  ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या ह्या हिरोचा चेहरा म्हणजे कोणत्याही तरुणीने त्याच्याकडे  बघताक्षणी प्रेमात पडावं असा गोड. पण प्रारब्धातल्या संघर्षाच्या भोगामुळे १६५ रुपये महिना पगार असलेली मिलिटरी सेन्सर ऑफिस मधली क्लार्क ची नोकरी पत्करावी लागली कारण खिशातले पैसेच संपत आले होते. 

 

READ ALSO : शुक्रवारची फिल्मी मज्जा

ही नोकरी म्हणजे सैनिकांची आलेली पत्रे त्यांच्या नातेवाईकांना वाचून दाखवायची. पुढचं एक वर्ष ही नोकरी जबरदस्तीने करावीच लागली.त्यातले ४५रुपये दरमहा आपल्या गावी वडिलांना पाठवून ह्या हिरोने एक वर्षाचे भोग भोगले. आणि आपल्या मोठ्या बंधूकडे मुक्काम हलवला.कोण होता हा हिरो आणि त्याचे मोठे बंधू? 

‘धर्मदेव पिशोरीमल आनंद’  म्हणजेच “देव आनंद”.  पंजाबमधल्या गुरुदासपूर इथे २३सप्टेंबर १९२३ मध्ये जन्म आणि बी ए पर्यंत शिक्षण झाल्यावर मुंबईत पदार्पण. पुढे शिकायचं होतं पण वडिलांच्या आर्थिक क्षमतेमुळे अशक्य होते कारण सर्वसामान्य कुटुंबातला जन्म .

मोठे बंधू चेतन आनंद हे  ‘जनं नाट्य संघात कार्यरत असल्यामुळे देवानंद त्याच संस्थेत सहभागी झाल्यावर बऱ्याच छोट्या मोठ्या नाटकातून कामे केली, त्यामुळे लोकांच्या समोर हा चेहरा आला आणि सिनेसृष्टीत पदार्पण झाले…मुंबईत आल्यानंतर तीन वर्षांनी देवानंदला बॉलिवूडच्या प्रभात स्टुडिओच्या एक हिंदी सिनेमात काम मिळाले, तो सिनेमा होता ‘हम एक है’. साल होते १९४६ , हा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही चालला नाही त्यामुळे  “देव आनंद” हे नाव लोकांना कळलेच नाही. त्यानंतर प्रभात स्टुडिओ मध्ये देव आनंदची भेट गुरुदत्त बरोबर झाली. त्यावेळी गुरुदत्त प्रभात स्टुडिओमध्ये कोरिओग्राफर म्हणून काम करत होते. तेंव्हा “जिद्दी” नावाचा चित्रपट प्रभातच्या बॅनर वर झळकला. आणि त्याचा नायक म्हणून देव आनंद ही चमकला, ह्या चित्रपटाने चांगली कमाई केली आणि देव आनंद चं नाव सुद्धा मोठं झालं.

१९५० मध्ये देव आनंदने  चित्रपट निर्मिती करायचे ठरवले आणि त्याला लगेच सुरुवातही केली नवकेतन फिल्म्स च्या नावाने पहिला चित्रपट निर्माण झाला  ‘अफसर’. ह्यात त्यावेळची ख्यातनाम नायिका म्हणून सुरैय्या हिची निवड केली गेली आणि नायक स्वतः देव आनंद.  ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते चेतन आनंद.पण तरीही हा चित्रपट काही चालला नाही.  पुन्हा एक नवीन चित्रपट करायचा ठरलं आणि ह्याची दिग्दर्शनाची जबाबदारी  गुरुदत्त यांना दिली गेली ह्या चित्रपटाचे नाव होते  “बाजी”. ह्या चित्रपटाने चांगली कमाई करून दिली आणि नाव पण मिळवून दिले.

हा देव आनंद यांच्या चित्रपटांचा चलतीचा काळ सुरू झाला, एका पाठोपाठ अनेक चित्रपट आले. मुनीमजी, दुश्मन, कला बाजार, सी आय डी, पेईंग गेस्ट,  गॅम्बलर,  तेरे घरके सामने, काला पानी,  असे अनेक चित्रपट आले आणि देव आनंद एक स्टाईल हीरो, म्हणूनच प्रसिद्ध झाले. देव आनंद सारखे केस, कपड्यांची स्टाईल, चालण्याची स्टाईल, बोलण्याची स्टाईल, आशा सगळ्या स्टाईल्स वेगळ्या. ज्या आत्तापर्यंत कोणत्याही हिरोच्या नव्हत्या . म्हणून लोक देव आनंद स्टाईल करू लागले.  देव आनंद ने आणलेली एक कपड्यांची स्टाईल म्हणजे पांढरा शर्ट आणि त्यावर काळा कोट. त्यामुळे देव आनंद खूपच चिकणा दिसायचा आणि त्यामुळे त्याचे चित्रपट पाहायला खूप मुली गर्दी करायच्या. पांढरा शर्ट आणि काळा कोट हा तर मुलींना फारच आवडायचा. त्यात तो जास्त हँडसम दिसायचा.

मुली वेड्या व्हायच्या त्याच्या अदाकारीवर. त्याच्या ह्या दिसण्यावर मुली इतक्या फिदा व्हायच्या की एक दोन मुलींनी तर त्या स्टाईलमध्ये त्याला पाहून पुढे काही नको म्हणून आपलं जीवनच संपवलं. हे कळल्यानंतर कोर्टाने देव आनंदला काळा कोट घालण्यावर बंदी आणली.

अशा ह्या अनेक स्टाईलमुळे प्रसिद्ध असलेला देव आनंद सगळ्यांचाच आवडता हिरो बनला. तरुण त्याच्या केसांच्या स्टाईल प्रमाणे स्वतः केस तसे वळवायला लागले आणि देव आनंद समजायला लागले. इतका देव आनंद लोकांवर ‘छा गया।’ आता प्रेक्षक इतके वेडे झाले तर त्याच्याबरोबर काम करणाऱ्यांचे काय?

अफसर” चित्रपटात देव आनंद ची नायिका होती  सुरैय्या. ह्या शूटिंगच्या वेळी बोट उलटल्यामुळे ती पाण्यात पडली, पण देव आनंद यांनी तिला वाचवले. त्या घटने नंतर त्या दोघांमध्ये जवळीक वाढली. सुरय्या देव आनंद यांच्यात प्रेम प्रकरण सुरू झाले, हे लोकांनाही कळू लागले, पण कामाच्या वेळात ते एकमेकांना भेटू शकत नव्हते. त्यामुळे प्रेम पत्र पाठवायला सुरुवात झाली.बोलबाला झाला जसा राजकपूर-नर्गिस, दिलीपकुमार-मधुबाला ह्यांच्या बाबतीत झाला होता तसाच. देव आनंद सुरय्याशी लग्न करायचे ह्या तयारीत असतानाच सुरय्याच्या आज्जीने (दादीने) ह्या लग्नाला विरोध केला. आणि शेवटी सुरय्यानेच स्वतः देव आनंदला घरच्या बंधनामुळे नकार दिला, आणि हे प्रेम प्रकरण थांबले.

पुढे देव आनंद यांनी त्यावेळची नावाजलेली अभिनेत्री कल्पना कार्तिक हिच्याशी विवाह केला. पण हे बांधनही फार काळ टिकले नाही. काही बाबतीत विचार न पटल्याने कल्पना कार्तिकने एकटे राहणे पसंत केले आणि देव आनंद यांनी आपल्या मुलासोबत राहणे पसंत केले. 

२००१ ह्या वर्षी देव आनंद याना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार मिळाला, आणि लगेच २००२ ह्या वर्षी  चित्रपट क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला.

असा हा हरहुन्नरी कलाकार , इतके धक्के पचवून  लंडनमध्ये आपल्या मुलाकडे असताना हृदयविकाराचा धक्का पचवू शकला नाही. ३ डिसेंबर २०११ ह्या वर्षी काळाच्या पडद्या आड गेला 

आणि एक एव्हर ग्रीन पर्वाचा अंत झाला..

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author