सैराट’ सुटलेल्या ‘धडक’चा ट्रेलर प्रदर्शित

‘सैराट’ सुटलेल्या ‘धडक’चा ट्रेलर प्रदर्शित

         सैराटने मराठी सिनेसृष्ठीचा डंका पूर्ण जगात वाजवला. भन्नाट कथा, सैराट झालेली पात्र, मनाला याड लागेल असं संगीत, झी मराठीचं भक्कम पाठबळ आणि झिंगाट असं दिग्दर्शन त्यामुळे सिनेरसिकांची मन बावरली नसती तरंच नवल झालं असतं ! या अप्रतिम कलाकृतीला हिंदी भाषेत बनविण्याचा मोह दिग्दर्शक शशांक खेतान याला आवरता आला नाही. त्याने तात्काळ धर्मा प्रोडक्शनच्या करण जोहरसमोर सैराटचा रिमेक करण्याचा प्रस्ताव मांडला आणि करण जोहरने हि लगेच त्याला परवानगी दिली. पुढे झी मराठी आणि धर्मा प्रोडक्शन यांच्या सहमतीने ‘धडक’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘धडक’ म्हणजे हृदयाचा ठोका. एकमेकांवर जीव जडलेल्या एका प्रेमियुगलाची, त्यांच्या संघर्षाची आणि समाजाच्या मानसिकतेची हि कथा. उदयपुर, राजस्थान, ज्याला ‘सरोवराचं शहर’ म्हणून हि ओळखलं जातं अशा शहरात घडणारी हि कथा आहे. सैराट चित्रपटात हि कथा सोलापूर जिल्ह्यात घडली होती. दिग्दर्शक शशांक खेतान हे राजस्थानचे असल्यामुळे त्यांनी राजस्थानची पार्श्वभूमी घेऊन चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला. पण ट्रेलर पाहता असं लक्षात येतंय कि शशांक खेतान यांनी विषयाची खोली समजून न घेता चित्रपटात बऱ्याच फिल्मी बाबी घुसविण्याचा प्रयत्न केलेला आहे.. एखाद्या विषयात कमजोर असलेल्या माणसाला त्या विषयामध्येच काहीतरी करायला सांगणं, अशा घासून घासून झिजलेल्या संकल्पनेला शशांक खेतान यांनी त्यांच्या ‘बद्री कि दुल्हनिया’ या चित्रपटात हि वापरलं होत आणि आता धडकमध्ये हि त्याची पुनरावृत्ती केलेली आहे.. या वरून दिग्दर्शकाचा संहितेविषयीचा आदर आपल्या लक्षात येतो.

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी ‘जान्हवी कपूर’ आणि शाहीद कपूरचा सावत्र भाऊ ‘ईशान खट्टर’ या चित्रपटात ‘आर्ची आणि परश्या’ च्या म्हणजेच ‘पार्थवी’ आणि ‘मधूच्या’ भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. जान्हवीची हि पहिलीच फिल्म असल्यामुळे ती थोडी गांगरलेली आहे. तिच्या अभिनयात हि ती जादू पाहायला मिळत नाही जी तिच्या आईमध्ये होती. अभिनेता आशुतोष राणा चित्रपटात जान्हवीच्या वडिलांची भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहेत. त्यांच्या भूमिकेच नाव रतन सिंग आहे. तसेच मराठमोळी ऐश्वर्या नारकर ईशानच्या आईच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.

चित्रपटात संगीत हे अजय अतुल यांचच असणार आहे. सैराटमधील ‘झिंगाट’ आणि ‘याड लागलं’ ह्या दोन गाण्याचं संगीत धडक चित्रपटात जसंच्या तसं वापरण्यात आलेलं आहे, तर अजून २ गाणी नवीन तयार करण्यात आलेली आहेत. ट्रेलर प्रदर्शनाच्या स्टेजवरून बोलताना अजय गोगावले म्हणाले कि, “सिनेसृष्ठीत बऱ्याच संगीत दिग्दर्शकांना झिंगाटसारखं गाणं बनवा असं सांगितलं जात, पण धडक या नवीन चित्रपटात ‘झिंगाट’ हे मूळ गाणंच असल्यामुळे चित्रपटाला याचा नक्कीच फायदा होईल असं त्यांना वाटतं.” या चित्रपटासाठी गीत लेखन केलेलं आहे अमिताभ भट्टाचार्य यांनी… झिंगाट गाण्यासाठी अमिताभ यांनी लिहिलेलं एक कडवं आपण पाहू.

गीतकार – अमिताभ भट्टाचार्य

ये धडाक-चिक-धूम धडकन बोले

जब तू छत पे आये..

नैन लडाके तुझसे..

मन मंदिर में जिंगल बेल हो जाये

तेरा हसीन चेहरा अहा..!

मेरे लबो से निकले वाह!

ढूँढ गुगल पे जाके

मिलेगा मजनू मेरे जैसा कहा !

पुरी पलटण के साथ,

लेके बारात,

बलमा ये तेरा

नाचे झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट….

 

         सैराट मराठी, कन्नड, हिंदी सारख्या बऱ्याच भाषांमध्ये बनलेला आहे अजून बऱ्याच भाषांमध्ये बनणार आहे.. यश.. यश.. जे काही म्हणतात ते हेच नाही का ? मनोरंजन विश्वामधील ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमती जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.