बालपणातल्या भावविश्वात पुन्हा घेऊन जाणारा चित्रपट लवकरच येतोय.. तुमच्या भेटीला..!!

बालपणातल्या भावविश्वात पुन्हा घेऊन जाणारा ‘राष्ट्रीय पुरस्कार’ विजेता चित्रपट लवकरच येतोय.. तुमच्या भेटीला..!!

 

आपल्या लहानपणी आपण किती  बावळट होतो हे आत्ताच्या लहान मुलांची तल्लख बुद्धी, त्यांची आकलन शक्ती बघितली की सगळ्याच वयानी मोठ्या झालेल्या लोकांना वाटायला लागलंय. कारण ही मुलं त्यांच्या जन्मापासूनच टी व्ही बघतायत, अँड्रॉइड मोबाईल सुद्धा सहज हाताळतात. मोबाईलची काही काही ऑपरेशन्स कशी असतात ते ही मुलं आपल्याला समजावून सांगतात. म्हणजे आपण किती मागे आहोत ह्याची जाणीव निश्चितच होते नाहीका ? पण आपण मोठे आणि ती मुलं लहान म्हणून काही गोष्टी आपण त्यांना दम देऊन करायला लावतो. मग ती मुलं बुचकळ्यात पडतात. कदाचित कधी दुखावले जातात किंवा कधी त्यांच्यात ईर्षा निर्माण होते. असं त्यांचं ‘नाजूक भाव विश्व’ कसं जपायचं हा मोठा प्रश्नच उभा राहतो.

आता चाळ संस्कृती किंवा वाडा संस्कृती संपुष्टात आली आहे. आता लोक सोसायट्यांमध्ये राहायला जातात, फ्लॅट संस्कृती हे त्याचं नाव. त्यामुळे, मुलं पटकन एकत्र येऊन वेगवेगळे खेळ खेळायला लागतात, पण त्यांचे आई वडील इतके पटकन एकत्र येत नाहीत. काहींना इगो असतो तर काहींच्या मनात न्यूनगंड. काही असतात अघळपघळ कुठेही धडक मारून ओळख करून घेणारे. काही नुसतेच सल्ले देणारे. काही राजकारणातले तर काही खडूस. हे सगळे एकत्र आले की काय काय गमती जमती होत असतील हे प्रत्यक्ष अनुभवल्यावरच कळणार. हे सगळं अनुभवायचं म्हणजे काय करायला लागेल ?  काहीनाही फक्त एक सिनेमा बघायचा…. होsssss  फक्त एक सिनेमा बघायचा. ह्या निरागस मुलांचा लपाछपीचा खेळ बघायचा त्यांनी एकमेकांना पाठीत दिलेला ‘धप्पा’ बघून आपल्या लहानपणी आपण दिलेला “धप्पा” आठवून सुखावून जायचंय. आपणही हे खेळ खेळलो होतो, ह्याची आठवण प्रत्येकाला झाल्याशिवाय राहणार नाही . म्हणून हा सिनेमा बघायचा आहे. ‘गणपती उत्सव’ आणि त्यात केलेले कार्यक्रम ह्याचा ह्या मुलांनी केलेल्या कार्यक्रमांच्या तयारीचा आणि त्यात मोठ्यांनी आणलेल्या अडथळ्यांचा होणारा परिणाम अनुभवायचाय. ह्यात कोण कुठे चुकतो, का बरोबर असतो ह्या गमतीदार उठाठेवी परत अनुभवायच्या आहेत. तरी पण काही वेगळं सांगून जाणारा हा चित्रपट आहे

 

READ ALSO :  वेबसिरीज क्षेत्रातही रोवला मराठी झेंडा.. पहा कोण कोण गाजवतायत आपले नाव हिंदी आणि मराठी वेबसिरीज मध्ये

ह्या काहीतरी वेगळ्या असणाऱ्या सिनेमाचं नाव आहे “”धप्पा””.  लहान मुलांच्या भावनां आणि मोठ्यांना ही काही सांगून जाणारा हा चित्रपट आहे . एक चांगली कलाकृती. ह्या चित्रपटाने मिळवला आहे ” राष्ट्रीय पुरस्कार “. म्हणजे सगळ्यांनीच पहावा असा चित्रपट आहे. ह्यात अनेक मराठी दिग्गज कलावंत वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहेत. निपुण धर्माधिकारी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, आणि प्रमुख भूमिका साकारणार आहेत  ‘इरावती हर्षे’,  ‘गिरीश कुलकर्णी’, ‘सुनील बर्वे’, श्रीकांत यादव, उमेश जगताप, आणि बरेच बाल कलावंत. येत्या १ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. तारीख लक्षातच ठेवा. 

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author