
‘धुमस’ चित्रपटाचा अॅक्शनपॅक्ड टीजर प्रदर्शित
बहुचर्चित ‘धुमस’ या चित्रपटाचा अॅक्शनपॅक्ड टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील युवा नेते उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर यांचे चित्रपट निर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील पदार्पण या चित्रपटातून होत आहे. गरुड फिल्मस् निर्मित ‘धुमस’चे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे.
सामाजिक वास्तव मांडणाऱ्या ‘धुमस’ चित्रपटाच्या टीजर मध्ये रियल लाईफ हिरो असणारे उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर जबरदस्त अॅक्शन सिन्स करताना दिसत असल्याने सोशल मिडीयावर या टीजरची जोरदार चर्चा होत आहे. नेते हे अभिनेते म्हणून झळकल्याने लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. चित्रपटात भारत गणेशपुरे, कमलाकर सातपुते, रोहन पाटील, साक्षी चौधरी, विशाल निकम, कृतिका गायकवाड, अनिल नगरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
READ ALSO : ‘एक होतं पाणी’ ची खास झलक प्रेक्षकांच्या भेटीस
Dhumas Teaserप्रतीक्षा संपली धुमस चित्रपटाचा पहिला Teaser आला आला रे आला धुमस चा पहिला Teaser आला धुमाकूळ करायला.दिग्दर्शक : शिवाजी दोलताडेनिर्माता : उत्तमराव जाणकर, गोपीचंद पडळकरसहनिर्माता : डी गोवर्धन#Dhumas #ComingSoon #Marathimovie #Marathi #Cinema #Teaser #Shivajidoltade #Director #Chitrapath #Team #Release #UttamravJankar #BharatGaneshpure #Kamalakarsatpute #HeenaPanchal #Zeemusic.Shivaji Doltade Rohan Patil Gopichand Padalkar Heena Panchal Rajesh Ghadigaonkar Kushal Konde II Kushal Konde Vinod Satav Uttamrao Jankar Bharat Ganeshpure Avdhoot Gupte Adarsh Anand Shinde
Posted by Dhumas on Tuesday, March 12, 2019
हिंदी आणि दक्षिणात्य सिनेमांमध्ये दिसणारी भव्यता आणि प्रभावी अॅक्शन सिन्स ‘धुमस’ च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर चित्रपटाचे निर्माते असून डी. गोवर्धन सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे गीतकार अविनाश काळे आहेत, पी. शंकरम यांचे संगीत लाभले असून सोनू निगम, श्रेया घोषाल, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, दिव्य कुमार, वैशाली माडे, कविता राम यांनी चित्रपटातील गीते गायली आहेत. तर चित्रपटाची तांत्रिक बाजू दक्षिणेतील नामांकित तंत्रज्ञांनी सांभाळली आहे. सामाजिक वास्तव दाखवणारा हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष
अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील
'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?
पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी
मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ). 'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री
पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...