‘डीजेवाला दादा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘डीजेवाला दादा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

“लगीन सराई” या गाण्याने सर्वांना थिरकायला लावले. गळ्यात गोडवा, सुमधुर ताल यांचा सुरेख संगम त्यामुळे सर्वच अगदी तल्लीन होऊन जातात. या गाण्याने सर्वांना वेड लावणारी वैशाली माडे आता लवकरच आपल्यासाठी घेऊन येत आहे. एक अनोखे गाणे ‘डीजेवाला दादा’.

सारेगमप २००७ च्या विजेत्या आणि बाजीराव मस्तानी मधील पिंगा गाण्याच्या तालावर सर्वांना नाचायला लावणारी मराठमोळी गायिका वैशाली माडेचे एक नवीन अल्बम साँग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. प्रिती नाईक निर्मित आणि पराग भावसार दिग्दर्शित ‘डिजेवाला दादा’ या वैशाली माडेच्या आवाजातील नव्या गाण्याचे रेकॉर्डींग अंधेरी येथील अशोक होंडा स्टुडिओमध्ये नुकतेच पार पडले. झी मराठी वरील ‘लागीर झालं जी’ या लोकप्रिय मालिकेचे पार्श्वगीत, ‘ये रे ये रे पावसा’ चित्रपटाचे टायटल साँग, लव्ह लफडे चित्रपटातील ‘ताईच्या लग्नाला’ यासारखी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी देणारे गायक आणि संगीतकार प्रवीण कुवर यांनीच ‘डिजेवाला दादा’ हे गाणे देखील संगीतबद्ध केले आहे.

 

READ ALSO : मराठी गाण्यांची सदाबहार मैफल भाग ५

हे गाणे खास डीजेवाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बनवले असल्याचे या गाण्याचे गीतकार कौतुक शिरोडकर सांगतात. या गाण्याला योग्य तो ठसकेबाजपणा आणण्यासाठी गाण्याच्या शब्दरचनेवर त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. नवोदित मराठी अभिनेत्री दिपाली सुखदेवे हि या गाण्यातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असून या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राजेश बिडवे करणार आहेत आणि लवकरच या गाण्याच्या चित्रीकरणाला देखील  सुरूवात होणार आहे. 

आजकाल लग्न समारंभ अथवा इतर कोणत्याही सण समारंभात डीजेचा वापर सर्रास होताना दिसतो. त्यामुळे त्या डीजे ऑपरेटरवर आधारित अनेक हिंदी – मराठी गाणी आत्तापर्यंत आली आणि हिट देखील झाली. पण हे गाणं या सर्वांत वेगळे आहे कारण याची शब्दरचना इतरांपेक्षा वेगळी आहे. ‘भावा, मित्रा, दादा’ सारखे आदरार्थी शब्द आणि वैशाली माडेच्या आवाजाचा अस्सल मराठमोळा ठसका हे या गाण्याचे  वेगळेपण आहे. डीजेवाल्यासाठी पहिल्यांदाच असे शब्द याच गाण्यात वापरले गेलेत. त्यामुळे थोड्या आगळ्या-वेगळ्या धाटणीचे हे हटके गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस नक्की उतरेल यात शंकाच नाही.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author