धनंजय माने इथेच राहतात का?…

धनंजय माने इथेच राहतात का?…

अशी ही बनवाबनवी, २३ सप्टेंबर २०१८ रोजी या चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाली. इतिहासात नोंद करावी असा हा चित्रपट आहे. कारण या चित्रपटाची जादूच निराळी आहे. तो काळ आणि आजचा काळ, काळात अंतर असला तरीही हा चित्रपट तरुण वयोवृद्ध यांच्या अगदी जवळचा आहे. या चित्रपटातील संवादाची उजळींनीच जणू प्रेक्षकांची झाली असावी. या चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही आपल्यात आहे असेच वाटते. धनंजय माने आणि त्यांचा इज्राइलचा मित्र यांची तर फारच उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. त्या काळात हा चित्रपट हिट झाला होता.

या चित्रपटाचे कथानक खूप साधे सहज असे आहे. चार मित्र त्यांच्या उमेदवारीच्या काळात दुसऱ्या शहरात जाऊन स्वतःला सिद्ध करण्यासाठी कशी कसरत करतात. राहण्यासाठी जागा मिळवणे,नोकरी मिळवणे, कमी पगार सर्व बाजूंनी खचून न जाता. प्रयत्न करत आपल्या ध्येयपूर्ती कडे जाणे. हा चित्रपट आजही प्रत्येक तरुणाच्या जवळचा आहे कारण त्याच्या आयुष्यातील हे असे काही क्षण आहे जे प्रत्येक तरुण उमेदवारीच्या काळात अनुभवतो.

या चित्रपटातील विनोदाने सर्व प्रेक्षक मंडळी खळखळून हसतात. वसंत सबनियस यांनी संवाद अप्रतिम लिहिले आहे. निखळ विनोद त्यांनी त्यांच्या संवादातून अगदी सहजरित्या मांडला आहे. विनोद हा अगदी लहान लहान गोष्टीतून कसा निर्माण होतो हे आपल्याला हा चित्रपट जाणीव करून देतो. या चित्रपटातील कलाकारांनी चित्रपट निर्मिती दरम्यान अगदी खूप मेहनत तर केलीच पण त्याच बरोबर मज्जा मस्त पण केलीच असणार हे मात्र कळून येते.

अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुधीर जोशी, अश्विनी भावे, निवेदता जोशी-सराफ, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर अशी एकापेक्षा एक कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. या चित्रपटाची निर्मिती किरणजी शांताराम यांनी केली होती. अशी एखादीच कालकृती असते जी प्रेक्षकांची असते. कोणत्याही पुरस्कारासाठी ही कलाकृती बनली नसून ती फक्त प्रेक्षकांसाठी बनली आहे. आजही हा चित्रपट बघताना तो कंटाळवाणा वाटत नाही.

तब्बल तीस वर्षांनी सुद्धा या चित्रपटाचा ताजेपणा अजून आहे.

 

READ ALSO : दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेला ‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

काही अपवादच असतात त्यांची इतिहासात नोंद होते त्यापैकी ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट ३ रुपयाचे तिकीट असलेल्या चित्रपटाने ३ कोटींची कमाई केली होती. काही योद्ध्यांना आपण लढत असलेली लढाई उद्या इतिहासात जमा होईल या बद्दल काहीच माहित नसते त्याचप्रमाणे ह्या चित्रपटाची निर्मिती करताना हा चित्रपट इतिहास निर्माण करेल असे कदाचित त्यांना वाटले असतील. अजूनही धनंजय माने इथेच राहतात का ? आणि ७० रुपयाचे डायबिटिसचे औषध इस्राईलच्या मित्राबरोररच   …

एक अप्रतिम कलाकृती ‘अशी ही बनवाबनवी’

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author