मुलगा मराठी अन मुलगी कानडी.. लग्नानंतर डोक्याला शॉट तर लागणारच ना..!!

२ स्टेट्स ची लव्ह स्टोरी, मुलगा मराठी अन मुलगी कानडी.. लग्नानंतर डोक्याला शॉट तर लागणारच ना..!!

हल्ली काय, कोण कोणत्या मुलीला कोणता मुलगा किंवा कोणत्या मुलाला कोणती मुलगी आवडेल ह्याचा काही भरोसा देता येत नाही बुवा. शहरांमध्ये एखाद्या कॉलेजात नाहीतर, नोकरीच्या ठिकाणी सगळ्या मातृभाषा असलेले विद्यार्थी किंवा कर्मचारी गुण्या गोविंदानं शिक्षण घेत असतात किंवा आपापला जॉब करत असतात. इथं रोज एकत्र येतात हे तरुण. आता तरुण म्हटलं की दोस्ती, मैत्री, प्रेम, लग्न वगैरे वगैरे कोणाचं तरी, कोणाबरोबर तरी जमतंssच. आणि सुरुवात जरा लांब लांब राहून होते, मग गप्पा मारताना , टाळी देऊन थोडी जवळीक साधली जाते. मग घराच्या अलीकडच्या चौका पर्यंत सोडायला जावं लागतं. आणि मग मैत्री झाल्याचं डिक्लिअर होतं. मग प्रेमात पडल्यावर सगळा ग्रुप सहकार्य भावनेतून मदत करायला लागतो, त्यांना सुद्धा जरा बरं वाटतं ना? कारण त्यांच्यात तेवढं डेअरिंग नसतं म्हणून सहकार्य. पण हे सगळं जमत असताना तुम्ही असता मराठी आणि ती असते दक्षिण भारतीय, हे लक्षात नाहीना येत. आणि ऐन लग्नाच्या तयारीत असताना कळतं, म्हणजे सगळ्यात जास्त जवळचे मित्र ह्या सगळ्याची जाणीव करून देतात. तू मराठी आणि ती गुडगुड भाषेत घरात सगळ्या मंडळींसमोर कसं बोलणार? सकाळच्या चहा पासून रात्रीच्या जेवणापर्यंत काय काय लागणार ते कसं कळणार घरच्यांना?

अशी सगळी भाषेची गडबड, कोणत्या वस्तूला त्यांच्या भाषेत काय म्हणतात? हे सगळे प्रॉब्लेम उभे राहणार, आपण खातो झुणका भाकरी, पण ते दक्षिण भारतीय लोक रोज इडली आणि डोसा खातात. आता लग्न झाल्यावर डब्यात तिने जर रोज इडलीच दिली तर? असल्या प्रश्नांनी डोकं खराब होऊ शकतं. पण हा विचार आधीच करायला पाहिजे होता ना? पण प्रेम म्हणजे काय असतं ते कळायच्या आधीच ते जमतं आणि घोटाळा झाला का काय? हे नंतर समजायला लागतं. अशा सगळ्या गमती जमती जर प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यात घडल्या तर? अंगावर काटा आला ना? म्हणून तुम्हाला सावध करायला हे सगळं सांगितलं, पण जर दुसऱ्या मित्राच्या आयुष्यात अशी गडबड झालीच तर त्याची काय परिस्थिती होईल ही मजा तुम्हाला बघायला कसं वाटेल?

 

READ ALSO :  सिड-मिट च्या प्रेमाचे साखरपुड्यात रूपांतर. लवकरच अडकणार लग्नाच्या बंधनात..!!

मग तयार व्हा असली खरीच गम्मत बघायला. लवकरच तुम्हाला एक मराठी तरुण आणि साऊथ इंडियन मुलगी ह्यांच्या मैत्री, प्रेम आणि लग्न ह्या प्रवासाची म्हणजेच वांग्याच्या भाजीबरोबर डोसा खायची वेळ येणार आहे. हसून हसून टेन्शन येणार आहे कदाचित, तुमच्या मराठी भाषेत ‘ट्ट’, आणि ‘थ’ हे अक्षर बऱ्याचवेळा येणार. म्हणजे नक्की काय होणार ते तुम्हाला मोठ्ठया पडद्यावर पाहायला पाहिजे तेंव्हा एक एक शब्द कळत जाईल. आणि मराठीतून साऊथ इंडियन विनोद कळायला लागतील. २०१९ ह्या नवीन वर्षातला एक नवा कोरा अफलातून मराठी चित्रपट झळकणार आहे लवकरच, आणि ह्या अफलातून सिनेमाचं नाव आहे.….’डोक्याला शॉट’…..आत्ताच ह्या सिनेमाचा टीजर लॉन्च झालाय. अजून थोडा वेळ आहे हा सिनेमा यायला, पण कोण कोण काम करणार आहेत ह्या ‘डोक्याला शॉट’ मध्ये हे कळलं तर जरा बरं वाटेल ना? ह्यात ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ह्या टी व्ही सिरीयल मध्ये चमकलेला एक भन्नाट तरुण अभिनेता म्हणजे ‘सुव्रत जोशी’ काम करतो आहे आणि त्याच्या बरोबर आहे तितकीच चमकलेली गाजलेली अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’. कसले कसले शॉट लागणार आहेत डोक्याला ते तुम्ही स्वतःच अनुभवायला पाहिजेत, म्हणजे कॉमेडीयुक्त टेन्शन कधी नसेल अनुभवलं तर मग थिएटर मधेच बसूनच अनुभवायला पाहिजेत, हे एक एक डायरेक्ट ‘डोक्याला शॉट’. तुमचं लग्न झालं असेल तर गम्मत बघाच, आणि अजून लग्न व्हायचं असेल तर काहीही करून बघा. १ मार्च ला सगळीकडे प्रदर्शित होणार आहे हा सिनेमा. सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी, गणेश पंडित, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन एवढे सगळे जण मिळून देणार आहेत डोक्याला शॉट. तारीख विसरलात तर तो आणखीन एक डोक्याला शॉट. लक्षातच ठेवा १मार्च.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author