बाप रे…! कुणी दिलाय प्राजक्ताच्या डोक्याला शॉट…?

बाप रे…! कुणी दिलाय प्राजक्ताच्या डोक्याला शॉट…?

डोक्याला शॉट…??? काय तर मग झालात का अवाक? नाही ना, तर मग एक नवीन कोरा करकरीत शॉट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नका होऊ इतके आश्चर्यचकित! कारण ‘बालक पालक’ आणि ‘यल्लो’ सारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर ‘अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहेत. उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांची निर्मिती असलेला ‘डोक्याला शॉट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच आजवर अनेक नावाजलेल्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावणारे शिवकुमार पार्थसारथी या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. तर सुमन साहू यांनी हा चित्रपट चित्रित केला आहे.

 

READ ALSO : मुंबई पुणे मुंबई ३ मधील या खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

आपल्या नेहमीच्या आयुष्यात आपण डोक्याला शॉट हा शब्द बऱ्याचवेळा वापरतो आणि आता त्यावर चित्रपट येणार म्हटल्यावर नक्की काय मज्जा येणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही. सोशल मीडियावर नुकत्याच झळकलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या कलरफूल लूकमध्ये सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी, रोहित हळदीकर, गणेश पंडित आणि ओमकार गोवर्धन हे अतरंगी कलाकार दिसत आहेत. चित्रपटातील इतर पात्रही लवकरच आपल्या समोर येतील. सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळी हि जोडी ह्या आधी पार्टी चित्रपटात आपल्या भेटीला आली होती. चित्रपटाचे नाव बघून प्रेक्षक नक्कीच ह्या चित्रपटाकडे आकर्षित होतील यात मात्र काही शंका नाही. सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी, रोहित हळदीकर, गणेश पंडित आणि ओमकार गोवर्धन हे युवा स्टार नक्कीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन देऊन जातील.

चित्रपटाचे पोस्टर खूपच हटके असल्यामुळे चित्रपटाचे कथानक बहुदा विनोदी असू शकते असे म्हणण्यास बराच वाव आहे.  सर्वच कलाकारांचे लुक अतरंगी आहे आणि नक्कीच काही तरी कल्ला होणार अशी अपेक्षा आपण ठेवू शकतो.. चित्रपट नेमका कशावर आधारित आहे? तो कधी प्रदर्शित होणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.. पण एकूणच हा चित्रपट नवीन वर्षात प्रदर्शित होणार अशी शक्यता आहे.

चित्रपटाच्या नावावरूनच या चित्रपटात काहीतरी धमाल पाहायला मिळणार हे कळतंय. त्यामुळे आता हे कलाकार  प्रेक्षकांच्या डोक्याला काय शॉट देणार आहेत याची उत्सुकता प्रेक्षकांत वाढली आहे. अतरंगी कलाकार लवकरच घेऊन येत आहे ‘डोक्याला शॉट’ .काय मग लागला ना सॉलिड शॉट…? चला तर मग फिल्मिभोंगा मराठी सोबत वाट बघूया या आगळ्यावेगळ्या डोक्याला शॉट ची…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author