फॉरेन रिटर्न नाही आमच्याकडे येतोय डोंबिवली रिटर्न.. लवकरच…

मुंबईची लाईफ लाईन, तिच्या शिवाय  आयुष्य म्हणजे रिकाम्या बैला सारखं. जरा कोणी जास्त वेळ खाल्ला की कपातला चहा अर्धवट ठेऊन पळायला लागतं ७:११ ची लोकल पकडायला. कारण फास्ट लोकल नाही मिळाली तर अक्खा दिवस सगळीकडेच लाल सिग्नल मिळायला लागतात, प्लेटफॉर्मवरचा टी सी एक मिनिट खातो, बस च्या रांगेत २०/२५ माणसे पुढे जातात, कंडक्टर दुसऱ्या टोकाला असतो, ऑफिस च्या लिफ्टला जास्त रांग वाढलेली दिसते, जिन्यावरून  उड्या मारत डॉट टाईमवर पंचिंग व्हायला पाहिजे. नाहीतर सगळी मजाच गेली समजा. महिन्याचं गणित बिघडून जातं. असं हे मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या लोकांचं काट्या बरोबर पळणारं लाईफ. येताना दरवाज्या जवळचा बार पकडूनच यायला लागतं. स्लो लोकल चालत नाही, अहो निवांतपणाची शरीरालाच सवय नाही. सगळं लाईफ स्लो झाल्यासारखं वाटतं. आता नाईलाजच झाला तर आझाद मैदानावरची क्रिकेटची थोडी मॅच बघायची आणि नंतरची फास्ट लोकल पकडायची. पण तिथं कोणता मोर्चा आला तर बाराच वाजतात. 

सकाळी पेपर सुद्धा टोयलेट मध्ये वाचायचा. अंघोळ फास्ट, कपडे फास्ट, नाश्ता फास्ट, चालणं फास्ट, लोकल फास्ट. सगळं कसं फास्ट. जाताना सी एस टी फास्ट, आणि येताना डोंबिवली फास्ट. मुंबईच्या उपनगरात डोंबिवलीचा मान, कारण मुंबईतले बहुतेक लोक डोंबिवलीत स्थायिक झाले. त्यामुळे मुंबईची खडानखडा माहिती डोंबिवलीकरांना जास्त. मुंबईच्या समस्या सोडवायला हे सगळ्यात पुढे. लोकलच्या प्रवाशांच्या समस्या सोडवण्यात हातखंडा. राजकारण पण फिरवायची ताकद ह्यांच्याकडे आहे. कोणाचं समर्थन करायचं तर कोणापासून दूर राहायचं हे कळायला अनेक वर्ष जावी लागतात. असं हे डोंबिवलीकरांचे जीवन. “डोंबिवली फास्ट” हा चित्रपट अनेकांनी पहिला असेल. त्यात ‘माधव आपटे’ हा रोल करणारा सर्व सामान्य माणूस म्हणजेच मराठी अभिनेता  “संदीप कुलकर्णी”. मराठी चित्रपट सृष्टीतील कुलकर्णी स्क्वाड मधलं अजून एक नाव. कोणतं स्क्वाड म्हणता..??हेच हो.. सोनाली कुलकर्णी -१ सोनाली कुलकर्णी -२, मृणाल कुलकर्णी, सुकन्या कुलकर्णी, सलील कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, आणखी पण असतील जे अजून नावारूपाला यायचेत.

 

READ ALSO :  तिचं सौंदर्य इतकं लोभस आहे की चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये 5 सेकंदाचं दर्शन सुद्धा चाहत्यांना मोहून टाकतंय….!

आता प्रोड्युसर म्हणून “संदीप कुलकर्णीचा” एक चित्रपट येतोय,  “”डोंबिवली रिटर्न””. इतकं डोंबिवलीला  का महत्व आहे आता आलं असेल तुमच्या लक्षात. कारण डोंबिवलीचा माणूस हा मुंबईच्या जादुई, मोहमयी, अचाट, अवघड, असामान्य, अद्वितीय, आशा ‘जीवनाच्या मुशीत’ चांगला तावून सुलाखून निघालेला एक हिराच की. सगळे पैलू असे दिसतात, जssरा हलला की चमकतात. मुंबईत राहायला परवडत नाही म्हणून जीवाची परवड करत रोज मुंबईत नोकरीसाठी येतो आणि जातो . आता “डोंबिवली रिटर्न” म्हणजे नक्की काय. सी एस टी – ते – डोंबिवली चं लोकल चं रिटर्न तिकीट आहे  का  जसा फॉरेन रिटर्न माणूस असतो तसा डोंबिवली रिटर्न आहे का काय ते अजून नाही कळलं. पण जर एखादा नवखा माणूस डोंबिवलीत जाऊन रिटर्न सी एस टी ला  आला तर तो निश्चितच फॉरेन रिटर्न माणसापेक्षा भारी ठरेल. “सगळे पैलू पाडून येईल” आणि  चम चम करेल. म्हणजे दोन चार अनुभव जास्तच मिळतील. ह्या चित्रपटाची कहाणी एका मध्यमवर्गीय मुंबईकरांची कथा आणि व्यथा  दोन्हीही दाखवणारी असू शकेल. पण आता ह्या संदीप कुलकर्णींनी नक्की काय आणखी विशेष दाखवलंय ह्या चित्रपटात हे कळायला पाहिजे नाss. म्हणून आपल्याला थोडं थांबायला पाहिजे. कारण आत्ता अजून  शूटिंग चालू आहे, पण फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ तारखेला  शुक्रवार येतोय. पहिल्याच दिवशी बघून खात्रीच करू की.  हा डोंबिवलीवरचा सिनेमा म्हणजे निश्चित आपल्याच जवळचा असणार. पण आता उत्सुकता तर वाढली आहे. जरा कळ काढू मग काय आता……

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...