डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनपट उलगडणार रुपेरी पडद्यावर

डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनपट उलगडणार रुपेरी पडद्यावर

         डॉ. काशिनाथ घाणेकर, ज्यांनी मराठी रंगभूमी गाजवली, फुलवली, आपल्या रंगभूमीवरील आणि सिनेसृष्ठीतील कामगिरीने, अभिनयाचे नवे मापदंड उभे केले. अशा नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर एक चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ज्याचं नाव आहे “आणि काशिनाथ घाणेकर”. या ‘आणि’ शब्दामध्येच नाट्यवेड्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांचं वेड लपलेलं आहे. कारण नाटकाच्या श्रेयनामावलीत नाटकातील सर्व नट नट्यांची नावं लिहिली जातात पण सगळ्यात मुख्य व्यक्तीचं नाव ‘आणि’ च्या नंतर लिहिलं जातं. प्रत्येक कलाकार हेच बिरूद मिरविण्यासाठी धडपडत असतो. हे मिळवणं इतकं सोपं नसतं.. त्याला आयुष्यातील कित्येक वर्ष खर्ची घालावी लागतात. या दरम्यान आयुष्यात येणाऱ्या सामाजिक, भावनिक संकटांवर मात करावी लागते. तेव्हा कुठे व्यक्ती “आणि…….”  च्या पुढे पोहोचतो. त्याच ‘आणि’ च्या पुढे पोहोचलेल्या एका दिग्गज अभिनेत्याच्या जीवनावर बनणारा चित्रपट अनेकांना प्रेरणादायी ठरेल यात काही शंका नाही.

         काशिनाथ घाणेकर (जन्म १४ ऑगस्ट १९४० – मृत्यू २ मार्च १९८६) हे दंतवैद्य म्हणजेच दाताचे डॉक्टर होते. मुंबईमधील वरळी येथील त्यांचा दवाखाना सांभाळत ते नाटकांमध्ये काम करायचे. ‘गारंबीचा बापू’ या नाटकामधून काशिनाथ घाणेकर रंगमंचावर उतरले. पुढे त्यांनी एका पेक्षा एक सरस नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. ‘रायगडला जेव्हा जाग येते’ मधील ‘संभाजी’ असो किंवा ‘अश्रूंची झाली फुले’ मधील ‘लाल्या’ असो डॉ. काशिनाथ घाणेकरांनी आपल्या सकस अभिनयाने प्रेक्षकांची मन प्रफुल्लीत केली. घाणेकरांच्या नाटकांना हाऊसफुलचे बोर्ड लागू लागले. हीच परंपरा त्यांनी चित्रपटांमध्ये हि कायम ठेवली. पाठलाग(१९६०), मराठा तितुका मेळवावा(१९६४), मधुचंद्र(१९६७) यांसारख्या चित्रपटात डॉक्टरांनी अनेक भूमिका जिवंत केल्या. अशा या महान अभिनेत्याचा मृत्यू नाटकाच्या दौऱ्यावर असताना हृदयविकाराने झाला.

     डॉ. काशिनाथ घाणेकरांची भूमिका पडद्यावर जिवंत करणार आहे मराठी सिनेसृष्ठीतला एक हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे. सुबोधने या आधी लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व या महान व्यक्तींच्या भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत. सुबोध एक उत्तम नट तर आहेच पण त्याच बरोबर एक उत्तम दिग्दर्शक हि आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाला महाराष्ट्रातील जनतेने डोक्यावर घेतलं होतं. सुबोधने ‘देऊळ’ या चित्रपटाची निर्मिती हि केलेली आहे. असा हा प्रतिभासंपन्न कलाकार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेला नक्की न्याय देईल अशी अपेक्षा आहे.

      वायकॉम १८ मोशन पिक्चर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत प्रख्यात लेखक अभिजीत देशपांडे. या चित्रपटात सुबोध भावे सोबत सोनाली कुलकर्णी आणि सुमीत राघवन यांच्या हि महत्वाच्या भूमिका असणार आहेत. हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०१८ ला प्रदर्शित होणार आहे.

       मनोरंजन विश्वामधील ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमती जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.