१३ जुलै २०१८ ला येतोय ‘ड्राय डे’

दारूसाठीचा नव्हे तर… रसिक प्रेक्षकांच्या आयुष्यातील तान-तणावाच्या मदिरेचा ‘ड्राय डे’ येतोय चित्रपट स्वरुपात, येत्या १३ जुलै रोजी. खरे पाहता हा चित्रपट गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता पण सेन्सॉरच्या काही अडकलेल्या बाबींमुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकलेला न्हवता. पण आता चित्रपटाच्या मार्गातील सगळे अडसर दूर झालेले असून चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालेला आहे.

      आजकालची तरुणाई खूप तणावाखाली जगते आहे. अभ्यासाचा तणाव, करिअरविषयीचा मनात चाललेला गोंधळ, मोठ्यांच्या अपेक्षांचं ओझं आणि त्यात ऐन तारुण्यात पडणाऱ्या गुलाबी स्वप्नांच्या मागे धावण्याची घाई यामुळे वैफल्यग्रस्त होऊन तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे. अशाच काही तरुणांच्या आयुष्यातील आशा निराशेच्या खेळाची हि कथा आहे. चित्रपटाच्या नायकाचा ब्रेकअप झाल्याच्या दुखःत त्याचे दोन मित्रच जास्त दारू प्यायला लागतात, अन चित्रपटाचा नायक नायिकेसाठी झुरत असतो. एकीकडे मुलीचं प्रेम अन एकीकडे मित्रांचं प्रेम आणि तराजूच्या काट्याबर लटकलेला चित्रपटाचा नायक. या अशा परिस्थितीवर चित्रपटाचा नायक आणि त्याचे मित्र काय आणि कसा उपाय शोधून काढतात हे पाहण्यासारखं आहे.

आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव लिखित(कथा) आणि दिग्दर्शित ‘ड्राय डे’ या चित्रपटाची पटकथा-संवाद लिहिलेले आहेत नितीन दीक्षित यांनी, तर छायांकन केलेलं आहे नागराज दिवाकर यांनी. या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी पार पडली आहे अमित कुमार यांनी, तर चित्रपटाचे  संगीत दिग्दर्शक आहेत अश्विन श्रीनिवासन. समीर सामंत लिखित ‘गोरी गोरी पान’ या गाण्याने तर  अक्षरशः धमाल उडवून दिलेली आहे. रेडियो मिर्चीवर सलग सहा महिने हे गाणे नंबर १ पोझिशनवर वाजवले जात होते. गायक विशाल ददलानी यांच्या आवाजातील व जय अत्रे लिखित ‘दारू डिंग डांग’ हे गाणेदेखील प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झालेलं आहे.

ड्राय डे ह्या चित्रपटाच्या निमित्ताने ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल हि फ्रेश जोडी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. त्याचबरोबर कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, आयली घिए, अरुण नलावडे आणि जयराम नायर हे कलाकार हि आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहेत.

प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय बनलेल्या व हटके पद्धतीने तरुणांची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असणं स्वाभाविकच आहे, पण पाहायचं हे आहे कि हा चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनरसाने ओलचिंब करतोय कि अपेक्षाभंग करत प्रेक्षकांना ठेवतोय ‘ड्राय’.

        मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.