‘एक होतं पाणी’ ची खास झलक प्रेक्षकांच्या भेटीस

एक होतं पाणी’ची खास झलक प्रेक्षकांच्या भेटीस

एक होता राजा, एक होती राणी, उद्या म्हणू नका… ‘एक होतं पाणी’ अशी हटके टॅग लाईन असणारं ‘एक होतं पाणी’ या आगामी मराठी चित्रपटाचे टिझर रिलीज करण्यात आला. या चित्रपटातील बालकलाकार चैत्रा भुजबळ हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत टिझर रिलीज करण्यात आला. व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज, प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ, विजय तिवारी निर्मित आणि रोहन सातघरे दिग्दर्शित ‘एक होतं पाणी’ हा चित्रपट पाणी समस्येसारख्या जवलंत सामाजिक विषयावर भाष्य करतो.

अलीकडेच ‘एक होतं पाणी’ चित्रपटाने ‘ अंबरनाथ चित्रपट महोत्सवा’ मध्ये यंदा ६ नामांकनं मिळवलेली त्यातील २ पुरस्कारांवर म्हणजेच ‘सर्वोत्कृष्ट कथा-आशिष निनगुरकर’ आणि ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार चैत्रा भुजबळ’ या पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवण्यात यशस्वी झाले.तसेच नोएडा येथे संपन्न झालेल्या 6 व्या नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये “दखलपात्र ज्युरी पुरस्कार” मिळाला. दर्जेदार निर्मितीमूल्य, उत्तम कथानक आणि प्रतिभावान कलाकार यांचं समीकरण एकदा जुळून आलं की सुजाण रसिक-प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप ही ठरलेलीच. ‘एक होत पाणी’च्या बाबतीत नेमकी हीच बाब विशेष उल्लेखनीय ठरतेय. आशिष निनगुरकर* यांच्या लेखणीतून साकारलेला हा विषय समाजाच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालणारा असून सद्यस्थितीला धरून आहे.

‘एक होतं पाणी’ या चित्रपटात हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळतील. या चित्रपटाचे छायाचित्रण योगेश अंधारे यांनी केले असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट सांगणारा ‘एक होतं पाणी; हा चित्रपट प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवले पाहिजे असा मौलिक संदेश देतो.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author