“एक निर्णय” मग तो आयुष्याच्या कोणत्या वळणावर घ्यायचा ? आणि नाही घेतला तर?

“एक निर्णय” मग तो आयुष्याच्या कोणत्या वळणावर घ्यायचा ? आणि नाही घेतला तर?

डिसेंबर महिना संपत आलाय, नवीन वर्षात आपण सगळेच पदार्पण करणार आहोत. ह्या वर्षी आपल्या हातून काही गोष्टी राहून गेल्यात ज्या खूप महत्वाच्या होत्या , पण राहिल्या बुवा. बघू आता पुढच्या वर्षात करू, बघू जमणार आहेत का? असा बहुतेकांचा विचार ठरतो, पण नवीन वर्षात पाऊल ठेवल्यावर आणखी काही नवीन गोष्टी समोर येतात, कधी त्या चांगल्या असतील तर कधी त्रासदायक, आणि मग चांगल्या असतील तर त्यात आपण हुरळून जातो , आणि त्यातच नकळत गुरफटुन जातो. पण वाईट असतील तर आपण त्यातून मार्ग काढण्यात आपला अमूल्य वेळ घालवतो. नाईलाज असतो, काय करणार? त्या नंतर परत चांगल्या वाईट घटना येत राहतात आणि ठरवलेल्या कोणत्याच गोष्टी होत नाहीत. कारण आपण त्या पूर्ण करण्याचा ठाम असा एक निर्णय घेतलेला नसतो. जोपर्यंत  घेतलेला निर्णय काहीही करून पूर्ण करायचा असा निश्चय होत नाही तो पर्यंत ठरवलेले मनसुबे असेच हवेत विरून जातात.

काही पुरुष मंडळी ३१ तारखेला निर्णय घेतात, आजपासून सिगरेट सोडली. आणि चारच दिवसांनंतर काहीतरी डोक्याला खुराक मिळतो, मग हातात लाडकी सिगरेट घेतल्याशिवाय डोक्याचा खुराक जात नाही. पुन्हा व्यसन आपल्यावर ताबा मिळवतं. आणि केलेला संकल्प धुरात मिसळून जातो. वजन कमी करण्याच्या संकल्प किती जण करतात हो? पण तो तर कधी टिकतंच नाही. तिसऱ्या दिवशी अंग दुखण्याच्या बहाण्याने फुल स्टॉप मिळतो. आता हे असले छोटे छोटे संकल्प मोडीत निघतात तर मग मोठा निर्णय तर लांबच राहिला. पण काही लोकांना असे काही मोठे निर्णय  घ्यावे लागतात. आणि ते टिकण्यासाठी खूप आटा पिटा करावा लागतो. घर बांधायचा निर्णय, नातं निभावण्याचा निर्णय, नात्यापासून दूर जाण्याचा निर्णय, नातं पुन्हा दृढ करण्याचा निर्णय, हे आणि असे सगळे निर्णय आयुष्यात काही जणांना घ्यावे लागतात, त्यातून काही आपल्याला लाभ होणार म्हणून घेतले जातात, काही आनंद निर्माण करणारे असतात तर काही दुःख. पण हे निर्णय घ्यायलाच लागतात.  जर ते नाही घेतले तर वेळ निघून जाते आणि पश्चाताप करायची पाळी येते.

 

READ ALSO :  फॉरेन रिटर्न नाही आमच्याकडे येतोय डोंबिवली रिटर्न.. लवकरच…

एक योग्य निर्णय हा अनेक  चांगल्या गोष्टी जुळवून आणतो, समाधान देतो , पण चुकीचा निर्णय गोत्यात आणतो. म्हणून कोणता निर्णय कधी घ्यायचा , हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. पण एक तरी निर्णय प्रत्येकाला घ्यावाच लागतो. असाच  “” एक निर्णय”” ज्या निर्णयाचे काय पडसाद उमटतात हे आपल्याला रुपेरी पडद्यावर पहाचंय, कसा आहे तो जीवनातला अत्यंत महत्वाचा निर्णय.  ‘एका निष्णात डॉक्टरच्या घरात त्याच्या पत्नीने घेतलेला निर्णय.’  लहान मुलांवर प्रेम करणारा लहान मुलांचाच डॉक्टर, एक मितभाषी डॉक्टर, पण त्याच्या पत्नीने घेतलेल्या निर्णयामुळे सगळ्या कुटुंबाच्या जीवनात काय परिवर्तन होतं? सुखद का? त्रासदायक असतो तो निर्णय? हे आपल्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनुभवायला मिळणार आहे, ह्या नवीन कोऱ्या मराठी चित्रपटात कोण कोण कलाकार आहेत माहितीये? मुख्य म्हणजे आत्ता बॉक्स ऑफिसवर दणक्यात चाललाय त्या “आणि डॉ. काशीनाथ घाणेकर ” ह्या भन्नाट चित्रपटाचा नायक, म्हणजे ‘सुबोध भावे’, आणि त्याच्या बरोबर असणार आहे ‘मधुरा’, वेलणकर. आणखी एक नवीन अभिनेत्री ह्यात दिसणार आहे  ती म्हणजे “कुंजिका”. आता कोणाचं कोणाशी काय नातं ह्याची मजा  चित्रपटातच बघितलेलं बरं.  पण अतिशय चांगली कथा, अतिशय चांगलं संगीत, आणि अतिशय चांगलं दिग्दर्शन . म्हणजे “”एक निर्णय””, आणि हा चित्रपट  झळकणार आहे  नवीन वर्षातल्या  १८ जानेवारी पासून.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author