मन्या आणि मनी पुन्हा प्रेक्षकाच्या भेटीला: एका लग्नाची पुढची गोष्ट

मन्या आणि मनी पुन्हा प्रेक्षकाच्या भेटीला: एका लग्नाची पुढची गोष्ट

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, हे गाणे 20 वर्षापूर्वी खूप लोकप्रिय झाले होते. ह्या गाण्याची जादू आजही तशीच आहे. मन्या आणि मनीच्या गोष्टीला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यावेळी प्रेक्षकांनी मन्या आणि मनीच्या प्रेमळ, रंजक, खट्याळ, विनोदी प्रेमकथेला अगदी डोक्यावर घेतले होते. आजही त्यांच्या ह्या गोष्टीला प्रेक्षक तसाच प्रतिसाद देतील.  प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांनी नाटकाची एक भिन्न व्याख्या निर्माण केली होती. प्रेक्षकांचा नाटकाकडे बघण्याचा दृष्टीकोनसुद्धा बदलला होता. संगीत नाटक हा एक प्रकार आहे पण एखाद्या नाटकात चित्रपटासारखी गाणी असणं ही एक नवीन बाब प्रेक्षकांसमोर आली आणि त्यांनी ती पसंत केली.

 

READ ALSO : आरॉन: गोष्ट एका प्रवासाची

आजची तरुण पिढी ही नाटकाकडे वळते आहे हे लक्षात घेऊन झी वाहिनीने आजच्या तरुण पिढीसाठी काही जुन्या पण दर्जेदार नाटकांची पुनर्निर्मिती केली आहे. याआधी सुद्धा हॅम्लेट आणि आता नुकतंच नटसम्राट ह्या नाटकांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे आणि ह्या गोष्टीचा फायदा घेत एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी वाहिनीने नेहमीच प्रेक्षकांना नवनवीन कलाकृती दिल्या आहेत. हेच त्यांचे नाविन्य जपत व प्रेक्षकांची आवड जोपासत मन्या आणि मनीच्या गोष्टीला पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. हीच झी वाहिनीची खासियत आहे. मन्या आणि मनीच्या आयुष्यात पुढे काय झाले? हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. त्यांच्यातील खट्याळपणा अजूनही तसाच आहे की काळाप्रमाणे ते दोघेही बदलले? मन्या अजूनही तसाच आहे की तो बदललाय? मनी आणि मन्याचे नाते अजून घट्ट झाले असेल की नाही?

प्रशांत दामले आणि कविता मेढेकर पुन्हा एकदा तीच जादू रंगभूमिवर साकारणार आहेत. पोट धरून हसण्यासाठी व मन्या आणि मनीची प्रेमळ, खट्याळ गोष्ट पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. ह्या नाटकाच्या प्रोमोशनसाठी सुख म्हणजे नक्की काय असतं हे गाणं प्रशांत दामलेच्या आवाजात एका अनोख्या अंदाजात आपल्याला ऐकायला मिळणार आहे. 17  नोव्हेंबरला एका लग्नाची पुढची गोष्ट ह्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. झी मराठी प्रस्तुत, प्रशांत दामले फॅन फाउंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, सरगम प्रकाशित एका लग्नाची पुढची गोष्ट. चला तर मग बघुया मन्या आणि मनी काय करतायत? रंगभूमीच्या दर्जेदार प्रेक्षकांसाठी ही एक दर्जेदार मेजवाणी झी मराठी वाहिनीकडुन. याचा आस्वाद नक्कीच घ्या आणि मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?

एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाला फिल्मी भोंगा मराठी कडून खूप खूप शुभेच्छा

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author