पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी’ या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.

‘जयडी’ च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली ‘राजकन्या’ म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी किरण सध्या राजकन्या या मालिकेतून आपल्याला रोजच भेटते. आत्ता लवकरच ती रुपेरी पडद्यावर एंट्री घेणार आहे. धोंडिबा़ बाळू कारंडे निर्मित-दिग्दर्शित तसेच जगप्रसिद्ध “कान्स चित्रपट महोत्सव” मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे ‘पळशीची पीटी’निवडण्यात आली.  या आगामी मराठी चित्रपटातून किरण एका ध्येयवेड्या ऍथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे. ग्रीन ट्री प्रोडक्शन प्रस्तुत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये नावाजलेला ‘पळशीची पीटी’ हा चित्रपट ग्रामीण भागातील मुलांचं भविष्य अधोरेखित करतो. ‘पळशीची पीटी’ने आजपर्यंत अनेक दिग्गजांची मनं जिंकली असून आत्ता रसिक-मायबापांच्या पसंतीची पोचपावती मिळवण्यास सज्ज झाले आहेत.

 

कधी खट्याळ… कधी भोळसट.. अज्यावर जीवापाड प्रेम करणारी जयडी एकतर्फी प्रेमातून व्हिलनही बनते. किरणने साकारलेल्या या भूमिकेची वाहवा आजही ऐकू येते. तर ‘राजकन्या’ मधली समंजस किरण प्रत्येक आई-वडिलांची लाडकी झालीये असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. किरणने आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ‘पळशीची पीटी’ मधील भागीची भूमिका ही अधिक जोखमीची ठरेल. माळरानात मेंढपाळ करणाऱ्या साधारण कुटुंबात जन्मलेली ही भागी आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करत नॅशनल ऍथलेट बनण्याचा मान पटकावते. या साहस कथेला सलाम करावासा वाटेल इतकी समरसून ही व्यक्तिरेखा किरणने साकारली आहे. अनेक नामांकन आणि पुरस्कार विजेत्या किरणला या व्यक्तिरेखेविषयी विचारले असता, ”येणारी प्रत्येक संधी मी आव्हान म्हणून स्विकारते. अपेक्षांची उंची गाठायची असेल तर नवनवीन आव्हानं सुद्धा स्विकारता आली पाहिजे.  ही ताकद मला माझ्या रोजच्या कामांतून मिळते” असं किरण म्हणते.

‘लागीरं झालं जी’ मध्ये शितलीच्या काकाच्या भूमिकेतील अभिनेते धोंडिबा बाळू कारंडे यांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. आता त्यांच्यातल्या दिग्दर्शकालादेखील तितकीच लोकप्रियता लाभेल अशी आशा आहे. ग्रामीण भागातील उदासीन शिक्षणपद्धतीवर भाष्य करणारा ‘पळशीची पीटी’ हा त्यांचा चित्रपट तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम करतो. मराठी मनोरंजन क्षेत्रात नावावरूनच कुतूहल जागं करणाऱ्या या चित्रपटाची चर्चा सध्या रंगत  आहे. येत्या २३ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालेला आहे.

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author