मराठी चित्रपटातील सदाबहार गीतांची मेजवानी

मराठी चित्रपटातील सदाबहार गीतांची मेजवानी

मराठी चित्रपटात संगीत म्हणजेच गाणे यांनी नेहमीच एक महत्वाची भूमिका साकारली आहे. काही अप्रतिम गाणी जी आजही आपल्या ओठावर असतात. संगीत आपल्या जीवनातील बहुमूल्य घटक आहे. संगीत आपले धक्काधक्कीचे जीवन सहज बनवते. आपल्य आयुष्यातील प्रत्येक प्रसंगानुसार गीतांची रचना केलेली असते. आपण प्रसंगानुसार गाण्याची निवड करून ती ऐकतोच. तुम्ही मी नक्कीच म्हणाल आज मी अचानक संगीत आणि गाणे याबाबत का मत व्यक्त करते तर असे आहे. जेव्हा पासून बोलपट ची निर्मिती सुरू झाली तेव्हा पासून मराठी चित्रपटाने अप्रतिम संगीत दिले आहे.

प्रत्येक प्रसंगानुसार गाण्याची निर्मिती केली आहे, ब्लैक एंड व्हाइट चित्रपट त्यातील गाणेही अगदी सूर श्राव्य होते. काही गाणे अगदी अजरामर झाले जसे, ‘ यमुना जळी खेळू खेळ कन्हय्या  का लजाता, हे गाणे खुप गाजले होते.

तसेच,’ लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योतिया ‘. हि गीत आजही सहज ओठावर येतात. शेतकऱ्याचे गीत, कष्ट कार्याचे गीत, प्रेमाचे गीत, आनंदाचे गीत, सोहळ्याचे गीत, उत्सवाचे गीत, विजया चे गीत, देश प्रेमाचे गीत, देश भक्ति चे गीत, विरहाचे गीत, दुःखाचे गीत, प्रेमभंगा चे गीत, भावगीत, अशे बरेच काही प्रकार गीताचे आहे.

गीत हे चित्रपटातील अविभाज्य घटक आहे. काही गाणे आजही सुखाच्या किवा दुःखाच्या प्रसंगात आपल्याला नकळत पणे सहज ओठावर येतात. जसे ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे, ‘ हे गाणे अजूनही नकळत ओठावर येते. त्यातील गोडवा आजही ताजा आहे.

नवऱ्याचे प्रतीक म्हणुन जेव्हा तिच्या कपाळावर कुंकू लावते तेव्हा आपण सहजपणे हे गाणे नक्कीच गुणगुणतो,’ माझ्या कपाळी चे कुंकू कौतुकाने किती बाई निरखू, जीव भर ना, भर ना, खर वाटना,. मराठी चित्रपट सृष्टी ने सदाबहार गीतांची मेजवानी दिली आहे.

आई आजही बाळा ला झोजवताना नक्की ही अंगाई गाते निंबोणीच्या झाड़ामागे चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. ही अंगाई सर्व आई आपल्या बाळासाठी गातात.

अशाच सदाबहार गीतांनी आपली सकाळ पण होत असते. जुनी गाणी तीच जी आजही आपण ऐकतो. ही सदाबहार गीतांची मेजवानी.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author