मराठी गाण्यांची सदाबहार मैफल भाग ५

मराठी गाण्यांची सदाबहार मैफल भाग ५

गाणी नेहमीच आपल्या आयुष्यात आनंदी वातावरण निर्माण करतात. आपल्या सध्याच्या परिस्थितीनुसार गाणे आपला मूड बदलतो. जर व्यक्ती दुखी असेल तर गाणे हळुवार त्या दुखावर फुंकर घालते. व्यक्तीच्या आनंदात भर पडते आणि आनंद द्विगुणीत होतो तो गाण्यानेच. संगीत हे उपचाराचे काम करतो, असे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. संगीताचा आपल्या जीवनावर अतिशय सकारात्मक परिणाम होतो. कदाचित असे असेल म्हणूनच मालिकांमध्ये प्रसंगानुसार गाण्याची निर्मिती केली जाते.

काही मालिकांची शीर्षक गीते ही चित्रपटगीतां इतकीच अतिशय प्रसिद्ध झाली आहेत. मालिकेच्या संगीतावरून संपूर्ण शीर्षक गीत ओठावर येते. “जडतो तो जीव, लागते ती आस, बुडतो तो सूर्य, उरे तो आभास, आभाळमाया”

९० च्या दशकात टेलीव्हीजन क्षेत्रात सर्वात जास्त प्रसिद्ध झाले होते हे शीर्षक गीत, त्यानंतर प्रत्येक मालिकेच्या शीर्षकगीतावर बारकाईने लक्ष देऊन ते निर्मित करण्यात आले. “थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले       कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत”

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या ओठावर सहज येणारे हे शीर्षक गीत. “सुख आणिक दु: ख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती, वेगळे काहीतरी बघ सांगते आहे, सुख आणिक दु: ख वेडी अवंतिका”. “मन माझे मोरपिसी स्वप्न जणू, मन माझे शिशिरातील इंद्रधनू, अवघाची हा संसार”.

खूप सुरमयी अशी ही शीर्षक गीते. मराठी मालीकाविश्वात बऱ्याच मालिका प्रदर्शित होऊन गेल्या पण त्यातील अनेक मालिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या फक्त त्यांच्या शीर्षकगीतांमुळे व आजही त्यांची जादू अजून तशीच आहे. “मन होई फुलांचे थवे गंध हे नवे कुठूनासी येती, मन पाउल पाउल स्वप्ने ओळी हुळहुळणारी माती, मन वाऱ्यावरती झुलते, असे उंच उंच का उडते, मग कोणा पाहून भुलते, सारे कळत नकळतच घडते.”

मालिकेचा गाभा हा शीर्षक गीत आहे. कथा हा अविभाज्य घटक असला तरी मालिकेच्या शीर्षकाला साजेसे गीत हवेच असते. एक उत्तम शीर्षक गीत ज्याने ह्या गाठी बांधल्या आहे. “मुक्याने बोलले…गीत ते जाहले…स्वप्न साकारले…पहाटे पाहिले नाव नात्याला काय नवे…वेगळे मांडले सोहळे…तुजसाठी…हो    हो…मिळावे तुझे तुला…आस ही ओठी…कोणी कुठे बांधल्या  रेशीमगाठी…जुळून  येती रेशीमगाठी…आपुल्या रेशीमगाठी”

” अश्या अनेक प्रेम, नातेसंबंध आणि जीवनशैलीवर आधारित गीतांसोबतच जीवनाचे मर्म सांगणारे शिर्षकगीत जे गोट्या या मालिकेने प्रेक्षकांना दिले ते कसं काय विसरता येईल? “बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत, जसे रुजावे बियाणे माळरानी खडकात?”.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author