सदाबहार गाण्यांची मैफल भाग 4

सदाबहार गाण्यांची मैफल भाग 4

लोकसंगीत आणि लोकगीत यांचा सुरेख वापर आपण मराठी चित्रपटात पाहिला आहे. लोकसंगीत म्हंटले की अनेक गाणी आपल्या ओठांवर येतात पण लावणी ऐकताच आपले पाय आपोआप थिरकतात. जुनं ते सोनं असे आपण कायमच म्हणतो आणि तेही खरच आहे. जुनी गाणी आपण आजही अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकतो. लावणी हा असा प्रकार आहे, जो त्या काळात खूप लोकप्रिय होता. एक एक अस्सल लावणीची बहार ‘”छबीदार छबी मी तोऱ्यात उभी जशी चांदणी चमचम नभी, अहो दाजीबा गावात होईल शोभा हे वागणं बर नव्ह”,

“ऐन दुपारी यमुना तीरी खोडी उगी काढली बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली”. सुरेख अप्रतिम अश्या लावण्या त्याकाळात मराठी चित्रपटात सादर होत होत्या, त्यातील  नटखटपणा, अदा, भावना यांचा संगम आपण अनुभवला आहे.

खोडी, लाडी गुलाबी आणि त्यात शृंगार रस होता, पण हा शृंगार रस लावणीत सादर करतांना ती अश्लील होणार नाही याची मात्र काळजी गीतकार संगीतकार यानी घेतली. “पदरावरति जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा, “लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर, गोवा नी काश्मीरला कुठं कुठं जायाचं हनीमूनला, सांगा कुठं कुठं जायाचं हनीमूनला”,

“तरुणपनाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं, अन सोळावं वरीस धोक्याचं, अन सोळावं वरिस धोक्याचं,” ब्लॅक अँड व्हाइटच्या जमान्यात ह्या लावण्यानी प्रेक्षकांना वेड लावले होते. प्रत्येक मराठी चित्रपटात एक तरी लावणी असायचीच.

कसं काय पाटील बरं हाय का, अहो बरं हाय का? काल काय ऐकलं, ते खरं हाय का? अहो राव तुम्ही, ते नाही तुम्ही, अहो चश्मेवाले तुम्ही, न्हाय न्हाय न्हाय न्हाय फेटेवाले तुम्ही, सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का? “,”

तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंगमहाल,” लावणीचा ठसका हा आधीपासून लोकप्रिय आहे. पूर्वी लोक मनोरंजनाचे ते एक साधन होते. आजच्या मराठी चित्रपटात लावणीचा प्रभाव कमी झाल्याचा आढळतो. लावणीची जागा आता आइटम नंबरने घेतली आहे. पण लावणीतील अदा, नटखटपणा मात्र या आईटम नंबरमध्ये बिलकुल आढळत नाही .

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author