मराठी चित्रपटतील गाण्यांची सदाबहार मैफल : भाग 3

प्रत्येक व्यक्ति कधी ना कधी प्रेमात पडतेच. अशी एकही व्यक्ती मग ती लहान असो वा मोठी सापडणार नाही ज्याने कधी प्रेम केले नाही. प्रेमाच्या अनेक छटा, रंग, रूप आहेत. वय, भावना, नाते यानुसार प्रेमाची व्याख्या बदलते. आईचे आपल्या मुलांसाठीचे प्रेम, बायकोचे नवऱ्यासाठी असलेले प्रेम, बहीण भावाचे प्रेम, मित्रांचे आपापसातील प्रेम, मुलांचे आई वडील यांच्यासाठीचे प्रेम, प्रेयसी आणि प्रियकराचे प्रेम. प्रेमाच्या या नानाविध छटा व रंगाढंगानुसार चित्रित झालेली मराठी चित्रपटातील अनेक गीत आजही आपल्याला प्रफुल्लित करतात. अबोल प्रेम व्यक्त करतांना हे नकळत गाणे ओठावर येते “सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला? रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला?”, “कधी तू दिसशील डोळ्यांपुढे, तुझ्यावाचून सुचे न काही वेड जीवाला जडे” ही गाणी जरी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातील असली तरीही ती आजही खूप छान वाटतात.

सांज ये गोकुळी सावली सावली, सावळ्याची जणू सावली, भावना व्यक्त करण्यासाठी गाणे हा एक उत्तम पर्याय आहे.

धुंद मधुमती रात रे, धुंद मधुमती रात रे, नाथ रे, तनमन नाचे, यौवन नाचे, उगवला रजनीचा नाथ रे, नाथ रे. पत्नीचा रुसवा दूर करून तिला परत सासरी घेऊन जायचे असेल तर नक्कीच पती पत्नीची समजूत याच गाण्याने काढत असणार. सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला, तुला न्यावयाला ग घेऊन गाडी, आलो सर्व सोडून मी शेतवाडी, तू असताना जोडीला या बुरख्याच्या गाडीला, नवा रंग येईल गुलाबी साडीला, सांगा या वेडीला! अहो सांगा या वेड्याला, माझ्या घरधन्याला, कशी जाऊ सांगा मी सासुरवाडीला, गोड असा हा रुसवा फुगवा दूर करताना पत्नी किती सुंदर आहे.

सौंदर्याची खान संबोधतो, “सौंदर्याची खान पाहिली, पाहिली आम्ही पहिल्यांदा, नयनामधला बाण लागला आम्हा पहिल्यांदा.

“ती येते आणिक जाते, येताना कधी कळ्या आणते अन जाताना फुले मागते, येणे-जाने, देणे-घेणे, असते गाणे जे न कधी ती म्हणते,”. ‘पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची मिठी सैल झाली.” “येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील, तुझिया माझिया प्रेमाची पावती साखर चुंबन देशील.” “दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे, स्वप्नात गुंगून जाणे, वाटेत भेटते गाणे, गाण्यात हृदय झुरायचे.” ही अप्रतिम दर्जेदार गाणी आपल्याला अलगद त्यांच्या प्रेमात पडतात.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...