बलाढ्य हिंदी चित्रपटांसमोर अजून हि टिकून आहे ‘फर्जंद’

बलाढ्य हिंदी चित्रपटांसमोर अजून हि टिकून आहे ‘फर्जंद’

        प्रदर्शनानंतरच्या २० दिवसानंतर हि फर्जंद प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी होतोय आणि परिणामी चित्रपट चांगली कमाई हि करत आहे. विरे दी वेडिंग, भावेश जोशी सुपरहिरो, रेस ३ यांसारख्या चांगल्या बजेटच्या चित्रपटांसमोर मराठमोळा ‘फर्जंद’ चांगली कामगिरी करत आहे. उत्तम स्पेशल इफेक्ट्स आणि धमाकेदार साहसिक दृश्यांनी भरलेला ‘फर्जंद’ मराठी सिनेसृष्ठीमधील ऐतिहासिक चित्रपटाची उणीव भरून काढत आहे. असे चित्रपट बनविण्यासाठी सामान्य चित्रपटांपेक्षा जास्त पैसे लागतात. हा घातलेला पैसा परत येईलंच अशी हि कोणी शास्वती देऊ शकत नाही. पण फर्जंद सारख्या चित्रपटांच्या यशानंतर निर्माते असे ऐतिहासिक किंवा जास्त बजेटचे दर्जेदार चित्रपट बनविण्यासाठी नक्की पुढे येतील.

१ जून रोजी प्रदर्शित झालेल्या फर्जंद ने पहिल्या दिवशी ३३ लाखांची कमाई केली, तर दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी अनुक्रमे ४९.५० लाख आणि ७५ लाख अशी कमाई केली. पहिल्या आठवड्यात चित्रपटाची एकूण कमाई झाली होती ३ कोटी १३ लाख रुपये. १७ जून पर्यंत ५ कोटी ७९ लाख रुपये चित्रपटाने कमविलेले आहेत. पहिल्या आठवड्यात फर्जंदला राज्यभरात ३०२ थिएटर्स आणि ४५० शो मिळाले होते, तर  दुसऱ्या आठवड्यात २४० थिएटर्स व ३९१ शो मिळाले होते. तिसऱ्या आठवड्यात थिएटर आणि शोंची संख्या पुन्हा कमी होऊन फर्जंदला १६२ थिएटर्स आणि २३० शो मिळाले.

स्वराज्य उभारण्यासाठी राजांच्या अनेक शिलेदारांनी आपल्या जिवाजी बाजी लावली. कित्येक जणांनी स्वराज्य रक्षणासाठी वीरमरण हि पत्करले. असाच एक शूर वीर योद्धा ‘कोंडाजी फर्जंद’ याच्या पन्हाळा किल्ला घेण्याच्या मोहिमेवर आधारित असलेला ‘फर्जंद’ हा चित्रपट प्रेक्षकांना खरी निष्ठा, राष्ट्रप्रेम याचे धडे देऊन जातो. अवघ्या साठ मावळ्यांनी, अडीच हजार मुघल सैनिकांचा पराभव केला आणि पन्हाळगडाची मोहीम साडेतीन तासांत फत्ते केली.

‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ ची प्रस्तुती असलेला ‘फर्जंद’  या चित्रपटाचे निर्माते आहेत अनिरबान सरकार आणि सहनिर्माते आहेत संदीप जाधव, महेश जाऊरकर आणि स्वप्निल पोतदार. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय दिग्पाल लांजेकर यांनी. तर नितीन चंद्रकांत देसाई यांनी चित्रपटाचे कलादिग्दर्शन केलेलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर, कोंडाजी फर्जंद या नायकाच्या भूमिकेत अंकित मोहन, तर बहिर्जी नाईक यांच्या बहुरूपी भूमिकेत आहेत प्रसाद ओक. यांसोबतच चित्रपटात गणेश यादव, अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, प्रवीण तरडे, आस्ताद काळे, हरीश दुधाडे, नेहा जोशी, राहुल मेहेंदळे, निखिल राऊत, राजन भिसे, अंशुमन विचारे, रोहन मंकणी, सचिन देश्पांडे, समीर धर्माधिकारी, प्रद्युम्न सिंग यांच्या हि सशक्त भूमिका आहेत.

         मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमतींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.