शुक्रवारची फिल्मी मज्जा

शुक्रवारची फिल्मी मज्जा

काय राव जुळतंय का? की जुळवून देऊ? जुळत नसेल तर कशाला काळजी करताय? तुम्ही फक्त हो म्हणा आम्ही जुळवून देतो. अहो कसली जुळवा जुळव करताय? जरा मला पण समजू दे. काय बाई हे आजकालचे फॅड?  गॅटमॅट आम्ही जुळवून देतो. काय बाई ही आजकालची पोरं, कशाला कॉलेजला जातात? गॅटमॅट करायला? अगं हो, तू का इतकी चिडत आहेस.? अहो, तुम्ही आपल्या सुरजला सांगा कॉलेजमध्ये दोन गावाकडून मुलं आली आहेत. जरा जपून. ठीक, पण तू कुठे निघालीस तयार होऊन? अहो आता त्यांनी गॅटमॅटची स्थापना केली आहे तर मी आपली सदिच्छा भेट देऊन येते. नक्की काय आहे गॅटमॅट?

 

READ ALSO : आरॉन: गोष्ट एका प्रवासाची

जाऊ दे न वं… लहानपण दे गा देवा. चैत्याचा खट्याळपणा काय खूब आहे! चैत्याच्या भावविश्वात एकदा तरी डोकावायला पाहिजे. काय झाले अचानक? फारच भावनिक झालात आपण? ते गणित फारच निराळं आहे. आई आणि मुलाला जोडणारी नाळ. त्यांच्यातील नाते असे शब्दात सांगणे कठीण आहे. हे नाते समजून घ्यायचे असते. जरा सुमीकडेसुद्धा जाऊन येईल.  काय आहे? जरा बोलेल म्हणते चैत्याबरोबर. तुम्ही येताय का चैत्याला भेटायला? नक्की याच. बघा तरी काय म्हणत आहे तो.

एक सांगायचंय मला. काय होईल आपल्या पुढच्या पिढीचं कोणास ठाऊक? त्यांचे जग आणि आपले जग यात खूप अंतर आहे. त्यांच्या दृष्टीने आपण वयस्क, जुनाट विचारांचे, रूढ़ीवादी, पारंपरिक. खरंच पालक आणि मुलं यांच्यात इतक अंतर आहे? नक्की काय आहे हे? जाणून घ्यायला पाहिजे. पालक आणि मुलं ह्यांच्यातील संवाद कुठेतरी खुंटला आहे. ही सर्व गल्लत त्याचीच आहे. संवाद असेल तर सुसंवाद साधता येईल आणि सुसंवाद साधला तर नकळत गृहीत धरलेल्या प्रत्येक अपेक्षांचे ओझे कमी होईल. तू बोलतेस ते अगदी खरं आहे. म्हणुन म्हंटले आहे मी. आज थोडी उसंत आहे म्हणुन मी पहिल्यांदा गॅटमॅट ला सदिच्छा भेट देते. मग जरा सुमी आणि चैत्याबरोबर गुजगोष्टी करते. आपल्या पुढच्या पिढीच्या प्रश्नाकडे जरा गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे यासाठी एक सांगायचंय मला.

तु निश्चिंत होऊन जा आज, खरच हे सर्व घडणे आवश्यक आहे. आमची ही आज दौर्‍यावर आहे. तिने तिचा आजचा आराखडा तयार केला आहे. तुमचं काय? मग आवडेल का तुम्हाला परत एकदा लहान व्हायला? आणि हो जर जुळत नसेल तर आहे आपले गॅटमॅट मंडळ. एकदा तरी साधुया संवाद आपल्या पाल्याबरोबर.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author