शुक्रवारची फिल्मी मज्जा

शुक्रवारची फिल्मी मज्जा

अहो इकडे या, मला आपल्या जमिनीची कागदपत्रं सापडत नाही आहेत. कुठे ठेवलीत तुम्ही? आज अचानक कशासाठी पाहिजे तुला ती कागदपत्रं आणि तुला नेमके काय करायचे आहे त्याचं? मला सात बाराचा उतारा पाहिजे. किती जमीन आहे आपली आणि कोण कोण वारस आहे? हे सर्व एकदा बघुन घेते. पुढे त्रास नको. स्त्रीच्या मनात काय सुरू आहे हे प्रत्यक्ष देवालाही उमगले नाही तर मी पामर काय? हो कळतंय मला, तिरकस आणि टोमणे यात तुम्ही तज्ञ आहात. पण तुमची बुद्धी इथे नका चालवू. ठीक आहे, पण सांग तरी कशासाठी पाहिजेत सर्व कागदपत्रं.? म्हणजे मला तरी कळेल. आपली किती जमीन आहे? आणि त्यावर काही कर्ज किंवा ती कोणत्या औद्योगीकरणासाठी वापरणार आहे का? जर जमीन बागायती नसेल तर उपयोग काय करता येईल? तिथे काही पिक घेता येईल का? अहो असे काय बघताय? शहरात वाढलेली माझी बायको आज अचानक शेतीविषयक चर्चा करू लागली म्हणुन जरा आश्चर्यचकित झालो.

 

READ ALSO : ‘मुळशी पॅटर्न’ – समृद्ध करणारा अनुभव – क्षितीश दाते

खरं सांगायचं तर मुळशीतील सखाराम आणि त्याच्या कुटुंबाच्या उपजीविकेचे साधन हे फक्त शेती आहे. सखारामचं त्याच्या मातीवर असलेलं प्रेम बघुन मन भरून आले. आज मला मुळशी तालुक्यात जायचे आहे. सखारामला भेटते. राहुल आणि सखाराम या दोघांची धडपड काही भिन्न आहे. जमीन थोडी जरी असली तरी ती आपणच कसावी असे वाटते मला. आज खूप दिवसांनी असे जाणवते. शेतकरी हा शेतीवर अवलंबून आहे तसेच आपणही शेतीवर अवलंबून आहोत. प्रगतीच्या नावाखाली औद्योगिकीकरण केले तर शेती उरणारही नाही आणि आपण खायचे काय? हो कळतंय, तु काळजी करु नको. सखारामला आपण दोघे भेटू. चल तयार हो मुळशीला जायचे आहे. हो मी तयार होते पण, जमिनीचे सर्व कागदपत्रे तयार ठेवा. राहुल काय करतो सध्या ते पण बघू. शेवटी ते तरुण सळसळते रक्त आहे.

लोकसंख्या वाढली आहे म्हणुनच सर्व प्रश्न आहेत. तिकडून येताना गंग्याच्या लग्नाला जाऊ. काय अहेर करावा? काही कळत नाही. हा काय करणार कोण जाणे? तुम्हा बायकांचे बरे आहे. कधी गंभीर विषयावरून थेट लग्नावर.

अहो साडी कोणती? नेसु ही बघा, छान आहे का? गंग्याची बायको खूप सुंदर आहे. लग्नाला जाऊ तेव्हा पुढचे समजेल. क्षणभर मला वाटले माझी बायको खूप वैचारिक बोलते. पण तसं काही नाही. थोडी गंभीर चर्चा आणि त्यानंतर चटकदार, चमचमीत मेजवानी. चला येता का मग मुळशीला?

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author