शुक्रवारची फिल्मी मज्जा

शुक्रवारची फिल्मी मज्जा 30 नवम्बर

आज काय आहे? तू तर एकदमच भारी दिसतेयस! काय कुठे दौरा? हे काय? अशी तयार झालीस जशी काय तू तरुणी विशीतील. आहाहा लाजवाब! एकदम कडक! अहो पूरे आता… मला कळतात हो तुमचे उपरोधिक टोले, अग रूसू नको माझी माधुरी. काय? हो आज अचानक माधुरी? काय बाई सर्व पुरुष सारखेच. काय झाले माझ्या प्रियेला? काही नाही? काय सांगू? त्या सरिता भाभीचे सारखेच वय विचारते. मग काय झालं.. सांगायचं ना त्यांना तुझे वय. तू अजुनही तरुण आहेस की जशी तु नवतरुणी कश्मीरी.. कोणत्याही स्त्रीला तिचे वय विचारू नये एवढेसुद्धा माहित नाही म्हणजे काय? आणि हो मला माधुरी म्हणु नका. ती आहे ना एक माधुरी तेवढी पूरे आता. राहील तर, मी काय म्हणत होतो, अग रागावू नको. बर दौरा कुठे आहे हे तर सांग.? एक दुसरी माधुरी आली आहे. तिला भेटून येते. काय दिसते ती कोणाला खरं नाही वाटणार! तिला वीस वर्षाची मुलगी आहे, काव्या… वाह किती छान नाव आहे!

 

READ ALSO : मुंबई पुणे मुंबई ३ मधील या खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

काय गं? कोणत्या दुनियेत हरवलीस…बरी आहेस ना? एकदम शांत, माझा चांद का तुकडा उदास झाला. तुमचं आपलं काहीही! चांद का तुकडा म्हणे, काव्याची जरा काळजी वाटते. तिची आई अशी का वागते कोणास ठाऊक? तिच्या वागण्याचा त्रास करून न घेता ती आईला तिची मुलगी असूनही आई होऊन सांभाळते असे कोण करते आजकाल? अतिशय समंजस आहे काव्या, पण ही माधुरी काही केल्या ऐकत नाही. किती ओढाताण होत असणार मुलीची.  ही मात्र आपल्याच दुनियेत खुश, जसे काही हिची काहीच जबाबदारी नाही. आई झाली मुलगी आणि मुलगी झाली आई. म्हटलं काव्याशी जरा बोलावे आणि माधुरीचापण कान धरावा आणि सांगावं की बाई तुझे वय काय आणि तू करते काय? काय हो तुम्हाला माहित आहे का? काय? ही माधुरी अशी का वागते अगदी विशीतल्या मुलीसारखी? अग मला कसे ठाऊक? हो हो… नाही तेव्हा सर्व गावाची खबर असते आणि आज अचानक हे कसे माहीत नाही तुम्हाला?

गं साजणी असं नाही माझे राणी, खरंच मला माहीत नाही. तु एक काम कर जा भेटुन ये माधुरी व काव्याला आणि तुच विचार काय आहे नक्की. मलाही सांग का वागते माधुरी अशी ते? हो नक्की सांगते. जरा ऐकते का? काय? वय विचारून घे, कशी दिसते ती वाह, लई भारी. अगदी नवतारुण्यातील नार. हो का? बाई मला माहितच नव्हतं. तुमचं एवढं बारीक लक्ष आहे तिच्याकडे. बायकोकडे किती बघता तुम्ही? कशी दिसते मी, काय? मी म्हटलं मघाशी, किती छान दिसते तू अगदी विशीतील तरुणी जशी…. बरं जाऊ दे. तुझे वय किती? म्हणजे तिच्या पेक्षा जास्त की कमी? अहो किती वेळा सांगितले पुरुषाने स्त्रीला वय विचारू नये. अग हो वय विचारू नये पण आपल्या बायकोलसुद्धा? कठीण आहे.

शुSSSS… तुम्ही पण माधुरीला भेटा पण वय विचारू नका.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author