शुक्रवारची फिल्मी मज्जा

शुक्रवारची फिल्मी मज्जा

अहो ऐकलंत का? आज शुक्रवार आहे. ‘हो तर मग काय?’. असं कसं? तुम्हाला माहित आहे, शुक्रवार असला की माझ्या उत्साहात भर पडते कारण शुक्रवारी एक तरी नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होत असतो आणि ह्या वेळेस मी तुम्हाला आधीच सांगितलं होत. ‘तू काय सांगितलं होतं जरा परत सांग. काय आहे! रोजच्या धावपळीत सकाळी काय खाल्ले हे संध्याकाळी नाही आठवत तर तू कधी काय सांगितले कसे आठवणार?’. हो मला माहित आहे तुमची स्मरणशक्ती. ‘सावधान’. ‘काय झाले आहे तुला?’ आज एक नवा अनोखा विषय असलेला मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याचे शीर्षकच ‘शुभ लग्न सावधान’ आहे. कथा निराळी म्हणता येईल आणि नाही पण म्हणता येईल. एक तरुण आणि तरुणी… दोघेही एकमेकांवर प्रेम करतात पण लग्नबेडीत अडकण्यासाठी मात्र थोडे साशंक असतात. मग ते लग्न करायचे ठरवतात. ‘अग थांब, जर तुला चित्रपटाची कथा माहित आहे तर मग…?’ अहो नाही माहित मग पुढे काय होते हेच बघायचे आहे मला. आता नुसते बघू नका, असे जा आणि तिकीट बुक करा. ‘हो करतो’ रुचा आणि अनिकेत यांची जोडी किती छान दिसते ना!.

READ ALSO : सदाबहार गाण्यांची मैफल भाग ४ 

तुला चित्रपट पाहायचा आहे पण हे माहित आहे का? ‘काय?’, या चित्रपटात सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले आहे. चित्रपटाचे कथानक हे आजच्या पिढीतील तरुणाईवर आधारित आहे. श्रुती मराठे किती सुरेख हास्य आहे तिचे… व्वा! ‘सुबोध भावे अजूनही किती तरुण वाटतो. अभिनयाच्या बाबतीत सुबोधने स्वतःला खूपच प्रगल्भ बनवले आहे. प्रत्येक चित्रपटागणिक त्याचा अभिनय उत्तरोत्तर कसदार होत गेला आहे.’ मोहन जोशी, निर्मिती सावंत यांच्याही यात भूमिका आहेत. हा चित्रपट थोडासा विनोदी अंगाने जाणारा आहे. चित्रपटाचे लेखन मयुरेश माधव जोशी यांनी केले आहे. समीर रमेश सुर्वे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.

अहो पुरे आता, तुम्ही तर चित्रपटाची समीक्षा वगैरे करताय की काय? अजून आपल्याला चित्रपट पाहायचा आहे. रुचा आणि अनिकेत लग्नबेडीत अडकणार कि नाही? आधी हे तर बघू द्या. ते लग्नाचा गुंता कसे सोडवणार? अनिकेत हा लग्नापासून इतका दूर का पळतो?  हे ही बघायचे आहे. जा तर मग तिकीट बुक करा.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author