गॅटमॅट : आम्ही जुळवून देतो

गॅटमॅट : आम्ही जुळवून देतो

प्रेमात पडलाय? ती खूप आवडते पण हिम्मत होत नाही तिला सांगण्याची, मग विचार कसला करताय? आम्ही आहोत ना! तुमचं जुळवून देतो. प्रेमात पडल्यावर कोणातरी एकाला पुढाकार घ्यावा लागतो. प्रेमाची कबुली दिल्याशिवाय कसे कळणार तिचे तुमच्यावर प्रेम आहे कि नाही? भीती वाटते ती किंवा तो नाही म्हणेल याची? दूर करा ही भीती, आम्ही आहोत ना. अरे प्रेक्षकांनो गोंधळून जाऊ नका. आम्ही आहोत म्हणजे ‘गॅटमॅट आम्ही जुळवून देतो’ हा आगामी मराठी चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे कथानक सध्याच्या पिढीला हवे तसे आहे. ‘प्रेम’ हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आयुष्यात एकदा तरी सर्वच प्रेमात पडतात पण किती आपले प्रेम सहजतेने व्यक्त करतात. प्रेम करणे सोपे पण व्यक्त करणे फार अवघड.

 

READ ALSO : आणि डॉ. काशिनाथ घाणेकर: आता काशिनाथ पर्व सुरु ….

गॅटमॅट या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरवरून हा चित्रपट नक्कीच धमाल करणार असे वाटते. टीझरमध्ये रंग्या आणि बगळ्या आपल्या भेटीस येते आहेत, हे दोघेही गॅटमॅटचे संस्थापक आहे. टीझरमध्ये महाविद्यालयीन रंगीत दुनिया अगदी योग्य पद्धतीने रंगवली आहे. रंग्या आणि बगळ्या प्रेक्षकांना त्यांच्या महाविद्यालयीन दुनियेत घेऊन जातात. गावाकडून आलेली मुलं कशा पद्धतीने कट्ट्यावर गॅटमॅटची संस्था स्थापन करतात हे पाहणे खूप रंगतदार ठरणार आहे. गॅटमॅटचा टीझर तरूण वर्गासाठी रंगतदार पर्वणी असणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये अक्षय टंकसाळेसोबत रसिका सुनील आणि निखील वैरागरसोबत पूर्णिमा डे अशी जोडीदेखील आपल्याला पाहायला मिळते.

अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि यशराज इंडस्ट्रीज निर्मित ‘गॅटमॅट’ या सिनेमाचा हा टीझर तरुणवर्गासाठी पर्वणी ठरत आहे. निशीथ श्रीवास्तव यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. येत्या १६ नोव्हेंबर पासून ‘गॅटमॅट’ संस्था सर्वांसाठी खुली होत आहे तरी लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी नम्र विनंती. मग येताय ना ?

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author