जेनेलिया म्हणते माऊली माऊली

जेनेलिया म्हणते माऊली माऊली

मराठी चित्रपट सृष्टीत अनेक वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येत आहेत. दिग्दर्शक किंवा  निर्माता आपला चित्रपट प्रेक्षकांना जास्तीत जास्त आकर्षित करेल हा विचार करून विविध विषयांवरील चित्रपट तयार करतात. दिग्दर्शकाने किंवा निर्मात्याने सुरुवातीपासूनच जर एका पेक्षा एक चित्रपट  दिले असतील तर त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दल प्रेक्षक वर्गात आधीपासूनच उत्सुकता असते.येणाऱ्या चित्रपटांना मिळणाऱ्या यशात तो चित्रपट तयार करणाऱ्या टीम ने तयार केलेल्या आधीच्या चित्रपटाचा देखील महत्वाचा वाटा असतो.असेच काही आगामी काळात येऊ घातलेल्या माऊली या चित्रपटाच्या  संदर्भात आहे.

रितेश देशमुख याची निर्मिती असलेले चित्रपट

रितेश देशमुख याने हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक चित्रपटात अभिनय केला आहे.आपल्या अभिनयाच्या जोरावर रितेश याने हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याची पत्नी जेनेलिया देशमुख ही  दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी व हिंदी चित्रपट सृष्टी या दोन्ही चित्रपट सृष्टीत प्रसिद्ध आहे.हिंदी चित्रपट सृष्टीनंतर रितेश मराठी चित्रपट सृष्टीकडे वळला. रितेश देशमुख याने मराठी चित्रपट सृष्टीत आत्तापर्यंत बालक पालक, लय भारी या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

लय भारी या चित्रपटात रितेश ने अभिनय केला असून तो आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसून येतो. रितेश देशमुख याची निर्मिती असलेला बालक पालक हा पहिला चित्रपट होता.बालक पालक या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले असून तो चित्रपट फार गाजला होता.

माऊली

रितेश देशमुख यांच्या निर्मितीसंस्थेचा माऊली हा चित्रपट येऊ घातला आहे.माऊली या चित्रपटाची निर्मिती जेनेलिया देशमुख हिने केली आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी माऊली या चित्रपटाचे दिग्दर्शन केले  आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले आहे. सोशल नेटवर्किंग साईट्स कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळते याचा प्रत्यत माऊली या चित्रपटाच्या संदर्भात पुन्हा एकदा  अनुभवण्यास मिळाला. जेनेलिया देखमुख हिने तिच्या ट्विटर वरील खात्यावरून हल्लीच माऊली या चित्रपटा संदर्भात ट्विट केले आहे.या ट्विट मध्ये  माऊली तो येतोय असे लिहीत येणाऱ्या चित्रपटाची एकप्रकारे घोषणाच केली आहे. जेनेलिया देशमुख हिने पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये एक तरुण धूसर अशा बॅकग्राऊंड मध्ये उभा दिसतो. क्लापबोर्ड क्लाप करून चौथ्या दृश्याची सुरुवात होते आहे असे दिसून येते.यामुळे प्रेक्षकांमधील चित्रपटासाठीची उत्सुकता  ताणलेली आहे.चित्रपटाच्या पोस्टर ने सुद्धा प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.प्रेक्षक आता माऊली या चित्रपटाच्या पहिल्या दृश्याची वाट बघत आहेत.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Crisenta Almeida

"Crisenta Almeida is a seasoned writer who goes by the description, WRITER BY DAY. READER BY NIGHT. She has been a writer with the content industry for a good number of years, which inspired her to start her content agency. Madly in love with storytelling, she knows how to weave a tale."