जेनेलिया देशमुखचे पुनरागमन  पहिला चित्रपट मराठी असेल अशी रितेश देशमुखची इच्छा.

माऊली चित्रपटाच्या प्रमोशन च्या निमित्तानं सध्या रितेश छोट्या पडद्यावर आणि बऱ्याच कार्यक्रमात झळकतोय. लै भारी नावाच्या सिनेमातून रितेश देशमुख ह्या बॉलिवूड च्या अभिनेत्याने मराठीत दमदार आगमन केलेलं आहेच. पण त्याची पत्नी जेनेलिया डिसुझा म्हणजेच देखमुखांची सून आणि सगळ्यांची जेनेलिया वहिनी सुद्धा मराठीत पदार्पण करेल अशी फिल्मी वर्तुळात चर्चा आहे. तुझे मेरी कसम ह्या चित्रपटात एकत्र काम केलेली ही जोडगोळी म्हणजे मराठमोळा आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या मुलगा रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा. ह्यांची केमिस्ट्री तर आपण पाहिलीच आहे. तुझे मेरी कसम व्यतिरिक्त मस्ती सिनेमात सुद्धा ह्याचीच जोडी दिसून आली.

रितेशने हिंदी सिनेसृष्टीत बऱ्यापैकी आपला जम बसवलाय. मराठमोळा, मजेदार, हॅपी गो लकी हिरो ते ‘एक व्हिलन’ सिनेमातील थंड रक्ताचा क्रूर खलनायक देखील रितेशने सादर केला आणि कायमच चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे. लोभसवाण्या चेहऱ्याच्या जेनेलियाला मात्र हिंदी मध्ये फारसा ठसा उमटवता  आला नाही. तरीही दक्षिणेकडे मात्र ती स्टार आहे. भरपूर दाक्षिणात्य चित्रपटात ती झळकली असून ते चित्रपट सुपर हिट झालेले आहेत. मात्र रितेशशी लग्न झाल्या पासून तिने सिनेमांना जणू रामराम ठोकला आहे.

 
 

READ ALSO : अनिकेत विश्वासराव चढणार बोहल्यावर

आता २ मुलांच्या जन्मानंतरही जेनेलिया तितकीच सुंदर दिसते जितकी १० वर्षांपूर्वी पदार्पणाच्या वेळी सुंदर दिसायची. रितेशच्या मराठी चित्रपटांसाठी तिने निर्मितीमध्ये मदतही केलेली आहे. इतकेच नव्हे तर लै भारी आणि आगामी माऊली ह्या रितेशच्या मराठी सिनेमांमध्ये एकेका मराठी गाण्यात तिने नृत्य आणि अभिनय सादर केलाच आहे. रितेश बरोबर इतकी वर्षे संसार करून ती मराठी भाषेत पारंगत ही झालेली असणार. निदान मराठी काळात तर नक्कीच असणार. म्हणजे तिला मराठी चित्रपटांची रस्ता धरता येऊ शकतो. मराठी जमलेच नाही तर डबिंगची सोय देखील असतेच. त्यामुळे जेनेलिया च्या मराठी चाहत्यांना तिने मराठी चित्रपटात देखील काम करावे असे वाटते. आणि ह्याला दुजोरा खुद्द तिचाच नवरा रितेशही देताना दिसतो.

रितेश म्हणतो जेनेलियाने आता चित्रपटांमध्ये पदार्पण करावे. आणि पाहिले मराठी चित्रपटातच. म्हणजे तिच्या होकारानंतर लगेच तो कामाला सुद्धा लागेल.रितेश च्या मराठीप्रेमामुळे तो नवनवीन सिनेमे काढत राहणार ह्यात शंका नाही. आणि जर जेनेलिया ने होकार दिलाच तर चांगली पटकथा शोधून रितेश सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवातही करेल कदाचित. आता नवऱ्याच्या ह्या गोड इच्छेला जेनेलिया हसून टाळते की दोन्ही मुलांना सांभाळून नवीन सिनेमाला हात घालते हे पाहणे खूप औत्सुक्यपूर्ण ठरेल.

जेनेलिया आणि रितेशच्या जोडी मराठीत एक दमदार सिनेमातून पाहायला मिळणार असेल तर चाहत्यांना पर्वणीच ठरणार आहे. तर जेनेलियाने रितेशच्या ह्या मागणीला दुजोरा द्यावा अशी अपेक्षा करूयात.. नजीकच्या भविष्यात ‘तुला माझी शपथ’ असे काहीसे नाव असलेला सिनेमाही बघायला मिळू शकतो..!!

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...