आता येणार कामगार नेते ‘जॉर्ज फर्नांडिस’ यांचा बायोपिक.

आता येणार कामगार नेते ‘जॉर्ज फर्नांडिस’ यांचा बायोपिक.

गेल्या वर्षभरात ‘बायोपिक चा जमाना आलाय असं वाटायला लागलं आहे. इतके चांगले आणि फटाफट एकामागे एक असे हे बायोपिक आले. आणि विशेष म्हणजे हे सगळेच्या सगळे अतिशय दर्जेदार म्हणून सिने रसिकांना आवडले. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, पु. ल. देशपांडे ह्यांचा ‘भाई’, ’बाळासाहेब ठाकरे’, झाशीची राणी, आणि अगदी मनमोहन सिंग सुद्धा .

एवढ्या लोकांचे बायोपिक खूपच दर्जेदार होते. नाट्य आणि राजकीय क्षेत्रात गाजलेली ही सगळी व्यक्तिमत्व सतत लोकांच्या समोर राहावीत म्हणून त्यांचे चाहते किंवा काही कमाईचा हेतूने तयार केले गेले हे चित्रपट. पण सगळ्यांनीच चांगली कमाई केली. म्हणून हा बायोपिकचा जमाना सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही. आपल्या देशात अनेक राजकीय नेते काही विधायक कामांसाठी लोकांचे दैवत बनले. त्यापैकी आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे कामगार नेते मा. जॉर्ज फर्नांडिस. ह्यांनी सुद्धा कामगार चळवळीत भाग घेऊन कामगारांच्या कल्याणासाठी खूपच मोठं काम केलं. त्यामुळे त्यांना आजपर्यंत खूप मानाचं स्थान मिळालं. वाजपेयी सरकारच्या काळात त्यांना संरक्षण मंत्री हे मोठं पद दिलं गेलं. पैसा आणि संपत्ती ची अजिबात लालसा नसलेला हा नेता सतत कामगारांसाठी लढत राहिला. गिरणी कामगारांच्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं. मा.बाळासाहेब ठाकरे आणि मा.जॉर्ज फर्नांडिस हे वेगवेगळ्या पक्षनेते असून सुद्धा एकमेकांचे चांगले मित्र होते. मा.बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चित्रपट तयार केल्या नंतर जॉर्ज फर्नांडिस यांचं नुकतंच निधन झालं. ह्या सच्च्या कामगार नेत्याचा लढा सगळ्यांच्या आठवणीत राहावा आणि बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस ह्यांच्या मैत्रीचे पैलू सगळ्यांना पाहता यावेत ह्या हेतूने, संजय राऊत यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर सुद्धा चित्रपट निर्माण व्हावा अशी आशा व्यक्त केली. आणि ह्या त्यांच्या आशेला अनेकांनी हिरवा कंदील दाखवला.

 

READ ALSO :  उपेंद्र लिमये ‘सूर सपाटा’ मध्ये साकारणार गावठी कबड्डी प्रशिक्षक

संजय राऊत ह्यांनी ह्या चित्रपटासाठी कामाला सुरुवात व्हावी म्हणून अनेक संबंधित लोकांशी संपर्क केला आणि काम सुरू झालं. ह्या सिनेमाचं दिग्दर्शन सुजित सरकार ह्यांनी करावं अशी जबाबदारी त्यांच्यावर टाकली गेली. चांगल्या भावनेतून हे काम सुरू झालं खरं पण काही त्रुटी राहिल्यामुळे पुढे हा चित्रपट तयार होईल की नाही अशी शंका निर्माण झाली. त्याचं कारण असं की- दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस ह्यांच्या पत्नीने म्हणजे लैला फर्नांडिस यांनी संजय राऊत यांनी एका पत्राद्वारे असे कळवले की ह्या कामाला खीळ बसली. त्यांनी पत्रात असे लिहिले की जॉर्ज फर्नांडिस ह्यांच्यावर चित्रपट बनवण्या पूर्वी संजय राऊत ह्यांनी परवानगी घेतली असती तर बरे झाले असते. आणि जॉर्ज फर्नांडिस ह्यांच्यावर चित्रपट बनवताना त्या चित्रपटात ज्या गोष्टी दाखवल्या जातील त्यात तथ्य आहे किंवा नाही ह्या गोष्टी तपासल्या जात नाहीत ,म्हणजे ह्यातली प्रत्येक गोष्ट ही बरोबरच असेल असे सांगता येत नाही. म्हणून त्यांनी ह्या चित्रपटाला आपला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे हे काम थांबले असले तरी योग्य ती परवानगी, आणि योग्य त्याच गोष्टींचा समावेश ह्या चित्रपटात झाला तर पुढचा मार्ग मोकळा होईल अशी आशा वाटते. म्हणून ह्या चित्रपटासाठी सगळ्या चाहत्यांच्या शुभेच्छा असणारच आहेत. आपण सुद्धा शुभेच्छा देऊया आणि हा चित्रपट लवकरच तयार व्हावा अशी इच्छा व्यक्त करूया.

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author