मानवइतिहासातील सगळ्यात प्राचीन खेळावर आधारित चित्रपट येतोय येत्या ६ जुलै रोजी

आजवर अनेक खेळांवर आणि खेळाडूंवर जगभरात चित्रपट तयार करण्यात आलेले आहेत. पण भगवान वसंतराव पाचोरे या मराठमोळ्या दिग्दर्शकाने मानवइतिहासातील सगळ्यात प्राचीन अशा खेळावर चित्रपट बनविलेला आहे ‘गोट्या’. मोहेंजो-दारो येथील उत्खननात हि ह्या गोट्या सापडल्याचं आढळून आलेलं आहे. यावरून आपल्या लक्षात येईल कि गोट्या हा खेळ किती प्राचीन आहे. पंधराव्या शतकात युरोपमध्येही ‘गोट्या’ ह्या खेळाचा प्रचार प्रसार झाला. जगात उपलब्ध असलेल्या खेळण्यांमध्ये सगळ्यात जास्त उत्पादन घेण्यात आलेले खेळणे जर कुठले असेल, तर ते आहे गोट्या. नुसत्या भारतातच गोट्यांशी संबंधित १० च्या वर खेळ खेळले जातात. अशा खेळावर आधारित चित्रपट येत्या १३ जुलै रोजी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेला आहे.

असं म्हणतात कि, “माणसाकडे जिद्द आणि चिकाटी असेल तर यश त्याच्या पायाशी लोटांगण घालतं” पण एखाद्याची जिद्द आणि चिकाटी समाजाला जे निरर्थक वाटतं अशा गोष्टीमध्ये असेल तर ??? अशाच परिस्थितीत अडकलेल्या ‘गोट्या’ नावाच्या मुलाची हि कथा आहे. आई, वडील, शिक्षक सगळेच चित्रपटाच्या नायकाला म्हणजेच गोट्याला शैक्षणिक यशाकडे खेचू इच्छितात… पण आपल्या नायकाचं मन रमतं ते म्हणजे गोट्यांच्या खेळात. गोट्या खेळताना त्याला ना वेळेचं भान राहतं ना जागेचं. त्याच्या ध्यानी मनी फक्त एकच गोष्ट असते ती म्हणजे गोट्या. एके दिवशी त्याचे शिक्षक वर्गात ऑलिंपिकमधील खेळांविषयी मुलांना माहिती देत असतात. त्यावर गोट्याच्या मनात असा विचार येतो कि शाळेत जर गोट्यांशी संबंधित खेळ खेळवले गेले  तर आपणही ऑलिंपिकमध्ये जाऊ शकू. गोट्याची हि जिद्द पाहून त्याचे शिक्षक यावर विचार करू लागतात.. तर एके दिवशी त्यांच्या असं लक्षात येतं कि ज्या खेळाला आपण दुय्यम समजतोय त्या खेळाचे विदेशात सामने भरवले जातात. मग काय ! सुरु होते एक क्रांती.. एक धडपड भारतीय मुळ असलेल्या खेळाचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठीची.

असा  हा प्रेरणादायी चित्रपट प्रस्तुत करत आहेत केतनभाई सोमैया, या चित्रपटाचे निर्माते आहेत विहान प्रोडक्शन आणि द्वारा मोशन पिक्चर. कथा-पटकथा-संवाद-गीतलेखन-दिग्दर्शन भगवान पाचोरे यांनी केलं आहे. छायांकन बाशालाल सय्यद यांनी केलं असून, राहुल भातणकर यांनी संकलन केलं आहे.

चित्रपटातील गाण्यांना संगीतबद्ध केलेलं आहे आघाडीचे संगीतकार अवधूत गुप्ते यांनी, तर नृत्य दिग्दर्शन केलंय गणेश आचार्य यांनी. तसेच कलादिग्दर्शन संदीप इनामके यांचे आहे. रंगभूषा ललित कुलकर्णी यांची, तर वेशभूषा नामदेव वाघमारे यांची आहे. या चित्रपटात ऋषिकेश वानखेडे, राजेश श्रृंगारपुरे, सयाजी शिंदे, आनंद इंगळे, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, हेमांगी राव, शरद सांखला, शशांक दरणे, पोर्णिमा आहिरे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमतींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.