‘ग्रहण’ फेम अभिनेते योगेश देशपांडे यांचे चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण

जाहिरात क्षेत्रातील कमर्शियल आर्टिस्ट, चित्रकार, निवेदक, संहिता लेखक, अभिनेता असे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे योगेश देशपांडे. काही दिवसांपूर्वी गाजलेल्या ‘ग्रहण’ या मालिकेत त्यांनी साकारलेली प्रमुख भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता त्यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण होत असून ’६६ सदाशिव’ असे त्यांच्या चित्रपटाचे नाव आहे. मुळात चित्रकार असलेल्या योगेश यांनी रेडीओ, टीव्हीसाठी जाहिरात लेखन-दिग्दर्शन केले आहे. याशिवाय पुलं, गदिमा यांच्यावरील कार्यक्रमासह विविध सांगीतिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे संहिता लेखन आणि सादरीकरण करत असताना त्यांनी अभिनयाची रुचीही जपली.

 

READ ALSO : ‘एक होतं पाणी’ ची खास झलक प्रेक्षकांच्या भेटीस

त्यांनी यापूर्वी ‘अवंतिका’, पिंपळपान’, ‘रेशीमगाठी’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आगामी ’६६ सदाशिव’ या चित्रपटाबद्दल बोलताना योगेश देशपांडे म्हणाले, जाहिरात विश्वात बरीच वर्षे काम केल्यानंतर आता काहीतरी वेगळे करावे असे मनात होते. कॉर्पोरेट फिल्म्स, ब्रँड अॅड फिल्म्सच्या दिग्दर्शनाचा अनुभव होता यामुळे चित्रपट क्षेत्र खुणावत होते, याच दरम्यान ’६६ सदाशिव’ चा विषय सुचला या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी सांभाळत मी अभिनय सुद्धा केला आहे. चित्रपटाचा विषय अतिशय वेगळा आहे, या चित्रपटात प्रतिभावंत, दिग्गज कलाकार दिसणार आहेत, चित्रपटाची निर्मिती ‘पुणे टॉकीज प्रा. लि.’ यांची असून हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर निर्माते आहेत. चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन अंतिम टप्प्यात असून चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

अभिनयक्षेत्रासाठी सुप्रितने घटवलं वजन

सुप्रितने घडवला अध्याय ११० किलो ते ७२ किलोपर्यंतचा यशस्वी पल्ला लहानपणापासूनच अभिनयाची ओढ... हौशी कलाकार म्हणून रंगभूमीवर सातवी-आठवीतच पडलं यशस्वी पाऊल... छोट्या-मोठ्या भूमिकांच्या साथीनं अभिनयाची आवड केवळ जपलीच नाही तर ही मनोरंजन क्षेत्राची खिंड लढवणं वाटतं तितकं...

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

About The Author