स्पृहा जोशीचा ‘होम स्वीट होम’ हा नवीन चित्रपट येतोय २८ सप्टेंबरला

स्पृहा जोशीचा ‘होम स्वीट होम’ हा नवीन चित्रपट येतोय २८ सप्टेंबरला

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशीच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आलेला आहे. चित्रपटाचं नाव ‘होम स्वीट होम’ असून तो २८ सप्टेंबर २०१८ ला प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते ऋषीकेश जोशी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. आपल्या कवितांनी प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या स्पृहाच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक हि कवितेतूनच मांडला गेलेला आहे. प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी ती कविता लिहिली आहे आणि त्यांनीच ती सादर हि केलेली आहे. कवितेचे शब्द पुढील प्रमाणे आहेत…

आयुष्याचा कागद घे, हिरव्या-हिरव्या रेघा मार,

हेच आपले दरी डोंगर, गडद कर, हिरवळ पांघर,

आता थोडा खाली ये, कोपऱ्यामधली जागा घे,

चौकोन काढ ; घर म्हण, त्रिकोण काढ ; छप्पर म्हण,

पाहिजे तितकं रंगव दार, काटेरी, पण कुंपण मार,

दार, उंबरा, अंगण, कुंपण, इतक्याच जागेत मावतो आपण,

घर झालं, दार झालं, चित्र निम्म पार झालं,

हाय काय अन नाय काय !

कवी – वैभव जोशी      

या चित्रपटात रीमा लागू या ही एक भूमिका साकारणार होत्या, पण त्यांच्या अकाली निधनामुळे मृणाल कुलकर्णी ती भूमिका करणार आहेत. ‘होम स्वीट होमच्या’ टीम तर्फे  १८ मे २०१८ रोजी एक भावनिक पोस्टर प्रदर्शित करून रीमा लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. पोस्टरमध्ये लिहिलं होतं कि, “रिमा ताई, एवढंच सांगायचं होतं.. आपलं घर तयार झालंय.” स्पृहा जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात मोहन जोशी आणि विभावरी देशपांडे यांच्याही महत्वाच्या भूमिका असणार आहेत.

घर, घरातील मानसं, त्यांच्यातील नातेसंबंध यावर भाष्य करणारा हा सिनेमा असणार आहे असं चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिल्यावर लक्षात येतंय. विनोदाची उत्तम जाण असणारे अभिनेते ऋषिकेश जोशी यांचा जरी हा पहिला चित्रपट असला, तरी त्यांनी आजवर केलेल्या कामावरून व त्यांच्या अनुभवावरून ते एक चांगला चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येतील अशी आशा आहे. आता हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कि, २००३ साली मा. राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ‘बालश्री’ या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली आणि पुढे बालकलाकार ते आघाडीची अभिनेत्री म्हणून नावारूपाला आलेली स्पृहा जोशी या ही चित्रपटात आपल्या भूमिकेचं सोनं करू शकेल कि नाही ?

       मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी आणि गमती जमतींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.