मनाला भिडणाऱ्या कवितेतून ‘होम स्वीट होम’ चा फर्स्ट लूक प्रदर्शित

मनाला भिडणाऱ्या कवितेतून ‘होम स्वीट होम’ चा फर्स्ट लूक प्रदर्शित

  • लेखक, अभिनेते हृषीकेश जोशी यांचे दिग्दर्शनात पदार्पण
  • संपूर्ण महाराष्ट्रात येत्या २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार

फ्रेम्स प्रॉडक्शन्स  कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोएक्टीव्ह व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे त्याचा फर्स्ट लुक सोशल मिडीयावर नुकताच लाँच करण्यात आला. चित्रपटातील नायक किंवा नायिकेचा चेहरा, गाणे या माध्यमातून सिनेमाचा फर्स्ट लुक प्रेक्षकांसमोर येतो मात्र या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच घराचे रेखाचित्र आणि घरावरची एक सुंदर कविता असा वेगळा प्रयोग करण्यात आला आहे.

‘होम स्वीट होम’च्या फर्स्ट लुक मध्ये शहरातील प्रशस्त इमारतीमधील आणि गावातील एक जुन्या धाटणीचे घर दिसत आहे. त्याच्या सोबतीला सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांची घराचे वर्णन करणारी सुंदर कविता आहे ती सुद्धा त्यांच्याच आवाजात कवितेत घर, आसपासचे दरी डोंगर, घराचा उंबरठा, अंगण, सभोवतालची हिरवळ, त्रिकोणी छप्पर, काटेरी कुंपण असे सहज सुचणारे साधे – सोपे शब्द मनाला अलगद भिडणारे आहेत. यामुळे ही कविता आणि वैभव जोशी यांचा आवाज पुन्हा – पुन्हा ऐकावासा वाटतो.

हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे ‘होम स्वीट होम’ या चित्रपटाचे निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर, विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते हृषीकेश जोशी यांनी केले असून दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. अनेक कलाकारांनी ‘होम स्वीट होम’चा फर्स्ट लुक आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केला आहे, यामुळे या चित्रपटात कोणते कलाकार आहेत? आणि या चित्रपटामध्ये नक्की काय आहे? हे जाणून घेण्याविषयी उत्कंठा निर्माण झाली आहे.

घर आणि त्याचे घरपण हे आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहेत. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातील एका घराची प्रतिमा दडलेली असते. कुणाला घर म्हणून प्रशस्त इमारतीमध्ये फ्लॅट हवा असतो, तर कुणाला घरासमोर अंगण हवं असतं. घराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरी घर हे प्रत्येकाला हवं असतं आणि सर्वांचं आपलं घर हे ‘होम स्वीट होम’ असतं. या हटके फर्स्ट लुकला सोशल मिडीयावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘होम स्वीट होम’ बघण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र चित्रपटगृहात प्रवेश करणार हे निश्चित.

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author