होम स्वीट होम : घर चार भिंतीचे नसून ते स्वप्नांचे असते

होम स्वीट होम : घर चार भिंतीचे नसून ते स्वप्नांचे असते

घराची कल्पना ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. घरात राहणे व जगणे ह्या खूपच भावनिक बाबी आहेत. सामाजिकदृष्ट्या बघितलं तर घर ही आपली गरज आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या त्याच्या मूलभूत गरजा आहेत. अन्न व वस्त्र या दोन गरजा काही प्रमाणात भागवल्या जाऊ शकतात. पण निवारा ही गरज भागवण्यासाठी माणूस खूप झटत असतो,’होम स्वीट होम ‘ या चित्रपटाद्वारे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक हृषीकेश जोशी घेऊन आले आहेत अशा एका दाम्पत्याची कथा, जे ३५ वर्षे एकाच घरात राहिले आहेत. हृषीकेश जोशी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.

रीमा लागू यांनी गेल्या वर्षी या जगाचा निरोप घेतला पण त्या ह्या कलाकृतीद्वारे आपल्यात आहेत. रीमा लागू यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात रीमा लागू यांच्याबरोबर मोहन जोशी, स्पृहा जोशी, सुमित राघवन आणि हृषीकेश जोशी यांच्या भूमिका आहेत.

चित्रपटाचे कथानक सामान्य असले तरीही ते भावनिक आहे. ही गोष्ट आहे श्यामल (रिमा लागू) आणि विद्याधर महाजन (मोहन जोशी) यांची. साठी पार केलेलं हे जोडपं दादरच्या घरात जवळपास ३५ वर्षांपासून राहत असतात. श्यामलला गुडघेदुखीचा त्रास असतो त्यामुळे तिला राहते घर सोडून टॉवर मध्ये राहायला जायचे असते. तर आयुष्यात समाधानी असलेल्या विद्याधरला मात्र त्याच जुन्या राहत्या घरात राहायचे असते. श्यामलला घर दाखवणाऱ्या दलालाची भूमिका हृषीकेश जोशी याने साकारली आहे. असेच एके दिवशी महाजन दाम्पत्याला त्यांच्या घराची किंमत ही साडेतीन कोटी आहे हे कळते आणि तिथून खरी मूळ कथेला सुरुवात होते. तिथून पुढे त्या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेल्या काळानुसार बदलतो .

 

READ ALSO : मराठी चित्रपटातील गाण्यांची सदाबहार मैफल : भाग २

मोहन जोशी आणि रीमा लागू यांच्या अभिनयातील सहजता लगेच जाणवते. उत्तम अभिनयाने नटलेला हा चित्रपट आहे. दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न असला तरी चित्रपट पाहताना नवखेपणाची जाणीव होत नाही. कवितांचा जर जास्तच भडीमार झाल्याचे जाणवते जो काही प्रमाणात चित्रपटाचा वेग मंदावण्यास कारक ठरतात. बाकी चित्रपट अतिशय छान आहे. घराचे स्वप्न पाहणाऱ्याने एकदा तरी हा चित्रपट पाहावा ‘होम स्वीट होम’ यातील संवाद साधे व सहज असल्यामुळे हा चित्रपट आपल्या घरातील वाटतो. एकदा तरी जरूर पाहावा असा.

फिल्मीभोंगा मराठी कडून ३. ५ स्टार्स

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author