नाटकांची सिल्वर ज्युबिली करतोय संजय नार्वेकर

नाटकांची सिल्वर ज्युबिली करतोय संजय नार्वेकर. लवकरच येतोय आपल्या भेटीला हे नाटक घेऊन.. 

बॉलिवूडचा देढ फुटया म्हणून चांगलाच प्रसिद्ध झालेला संजय नार्वेकर आपल्या मराठी सिनेसृष्टीचा चमकता तारा आहे. पण गेले काही महिने संजय नार्वेकरांचे त्यांच्या चाहत्यांना दर्शन घडलेच नाहीये. त्यामुळे त्यांच्यासाठी एक मस्त आनंदाची बातमी अशी की संजय नार्वेकर लवकरच रंगमंचावर धमाल उडवून द्यायला सज्ज झाले आहेत. ‘होते कुरूप वेडे’ ह्या नाटकासहित आपल्या नाटकांची सिल्वर ज्युबिली साजरी करणार संजय नार्वेकर..!! म्हणजे तब्बल चोवीस नाटके सादर करून ‘होते कुरूप वेडे’ हे पंचविसावे नाटक ते आपल्यासमोर पेश करणार आहेत. अर्थात आता संजय नार्वेकर आहे म्हटल्यावर धमाल विनोदी ढंगाने हे नाटक असणार ह्यात दुमत नाहीच. 

ह्या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका निभावणार आहेत राजेश देशपांडे आणि दुग्धशर्करा योग्य असा की त्यांचेही हे पंचविसावे नाटक आहे. ह्या नाटकाबद्दल बोलताना ते म्हणाले की, आपल्याला जे हवं असतं त्या ऐवजी दुसऱ्याकडे काय असतं तेच घेण्याकडे आपला कल असतो. हे नाटकही माणसाच्या अशाच मनोवृत्तीवर भाष्य करते. तसेच दिखावे पे ना जाओ अपनी अकल लागावो अशी काहीशी शिकवणही ते नाटकातून प्रेक्षकांना देणार आहेत. म्हणजे बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य हे जास्ती महत्वाचे आहे ते जपा असे त्यांना सांगायचे असावे. त्यातून संजयच्या अभिनयाने ह्या नाटकाला चार चांद लागणारच. त्यासोबत नवोदितांची भट्टी कशी जमते ते बघणे औत्सुक्याचे ठरेल.

 

READ ALSO :  १७ रात्रीत शूट केलेला सत्यपरिस्थितीवर आधारलेला, एक थरार चित्रपट.

राजेश आणि संजय ह्यांनी ह्या आधीही एकत्र काम केलेले असल्याने आता पुन्हा एकदा त्यांना एकत्र यायची संधी मिळाली आहे तेही दोघांच्या ‘पंचविसाव्या’ नाटकात. हा एक अजब गजब मिलाफच म्हणावा लागेल. राजेश म्हणतात संजय सोबत पुन्हा काम करायला मिळाल्यावर ह्या नाटकाला तो नवीन उंचीवर नेऊन ठेवणार हे नक्की. तर संजय म्हणतात, राजेश सारख्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी म्हणजे भरपूर शिकायला मिळणार आणि ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा रसिकहो नेहमीच्या रिवाजाप्रमाणे ह्या नाटकाच्या शुभरंभाचा प्रयोग नाट्यपंढरीत म्हणजेच दादरच्या शिवाजी मंदिरला होणार आहे. ११ जानेवारी २०१९ ही तारीख नोंद करून ठेवा आणि हाऊसफुल्ल चा बोर्ड लागण्याआधी आपल्यासाठी तिकीटही लगेच बुक करून टाका. ह्या धडाकेबाज नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर दणक्यात होतीलच हे सांगणे न लगे.. फिल्मीभोंगा मराठी तर्फे ‘होते कुरूप वेडे’ च्या टीमला भरभरून शुभेच्छा..!!

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघला मिळाली त्याची ‘गर्लफ्रेंड’ अलिशा…

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर पहिल्यांदाच दिसणार एकत्रअभिनेता अमेय वाघने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर टाकलेल्या विविध पोस्टमुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? असा विषय सर्वत्र चर्चिला जात होता. आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला...

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

नात्यांची लज्जतदार गुंफण असलेला ‘मीडियम स्पाइसी’ 

 नाटककार मोहित टाकळकर यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण कधी बाहेर जेवायला गेलं आणि मेन्यू कार्ड मध्ये एखाद्या रेसिपी पुढे स्पाइसी हा शब्द दिसताच काहीजण आनंदून जातात, मात्र ऑर्डर देतांना बहुतांश लोक ही ‘मीडियम स्पाइसी’ देतात असे अनेकदा दिसून येते म्हणजे लोकांना...

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

अभिनयात नाव आजमावण्यासाठी अमोल कागणेने घटवले ७ किलो वजन

मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्या-असण्याला अतिशय महत्त्व असतं. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजले गेल्यानंतर अमोल आपलं खरं पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे.अमोल कागणे हा...

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’ ! 

तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे...

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी ‘एक होतं पाणी’चे केले तोंडभरून कौतुक

निवडणुकीच्या धामधुमीत अनेक विषयांना राजकारणी हात घालताना दिसताहेत. रोज नवनवीन आश्वासनं ऐकायला मिळताहेत. सध्या मतदार राजा असल्यामुळे मतदाराला विविध प्रलोभनं दाखवून मतपरिवर्तन केले जात असतानाच व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज , प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व...

About The Author