हृदयात समथिंग समथिंग: प्रेमासाठी काय पण

हृदयात समथिंग समथिंग: प्रेमासाठी काय पण

प्रेमात पडलेल्या प्रत्येक तरुणाला काहीही करून त्याचे प्रेम मिळवायचेच असते. ते म्हणतात ना प्रेमात आणि युद्धात सर्वकाही क्षम्य असते, तसाच काहीसा प्रकार या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतो. हृदयात समथिंग समथिंग या चित्रपटात प्रेम मिळवण्यासाठी धडपड करणारा तरुण आणि त्याला त्याचे प्रेम मिळवण्यास मदत करणारा बॉस यांची खूप सुरेख जोडी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट जुना एव्हरग्रीन ‘गोलमाल’ या हिंदी चित्रपटाची आठवण करून देतो. चित्रपटाचे कथानक हे नाविन्यपूर्ण बनवण्याचा प्रयत्न जरूर केला आहे पण दिग्दर्शकाला त्यात म्हणावे तसे यश आलेले नाही.

समीर (अनिकेत विश्वासराव) प्रिया (स्नेहा चव्हाण) ला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडतो. पण तिच्यासमोर आपले प्रेम कसे व्यक्त करायचे हे त्याला कळत नसते. यात त्याला त्याचा बॉस (अशोक सराफ) मदत करतो. बॉस त्याला अनेक आयडिया देतो. त्यामुळे प्रियादेखील समीरच्या प्रेमात पडते. पण या दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाल्यावर समीरला कळते की प्रिया त्याच्या बॉसचीच मुलगी आहे. हे कळल्यावर प्रिया आणि समीर दोघांना पण आश्चर्याचा धक्का बसतो. वडिलांशी ते दोघे खोटे बोलायचे ठरवतात आणि त्यांना लग्नासाठी तयार करण्यासाठी एक बेत आखतात. प्रियाचे वडील लग्नासाठी तयार होतात का? या सगळ्यात काय धमाल मस्ती होते? हे प्रेक्षकांना हृदयात समथिंग समथिंग हा चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

READ ALSO : मराठी चित्रपटातील सदाबहार गाण्यांची मैफल भाग 3

अशोक सराफ हे त्यांच्या विनोदी भूमिकेमुळे नेहमीच वेगळे ठरतात. या चित्रपटात त्यांनी प्रेमगुरु बॉसची भूमिका अफलातून साकारली आहे. अनिकेत विश्वासरावचा अभिनय काही दृश्यात खूप ओढून ताणून केल्यासारखा वाटतो. तितकीशी त्याला ती भूमिका साकारता आली नाही. इतर चित्रपटाप्रमाणे हा चित्रपटही प्रेमाभोवती फिरतो. दिग्दर्शकाने चित्रपटात नाविन्य दाखवण्याचा प्रयत्न केला पण तो फारसा जमला नाही. काही दृश्यांचा उगीच भडीमार केल्यासारखे वाटते. भूषण कडू, स्नेहा चव्हाण, प्रियांका जाधव यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटात अनेक गाणी आहेत पण एकही गाणे लक्षात राहून ओठावर येईल असे नाही. चित्रपट खूप ताणलेला वाटतो. काहीश्या युक्त्या करून विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रेक्षकांना हसवण्यात चित्रपट अपयशी ठरला आहे. तितकासा नवीन विषय नाही.  फक्त वेळ घालवायचा आहे म्हणून बघण्यासारखा चित्रपट

फिल्मिभोंगा मराठीकडून ५ पैकी २ स्टार

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author