हृदयात समथिंग समथिंग

नुकताच अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांचा साखरपुडा झाला. ही नवीन जोडी आता लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाचा विषय हा प्रेमावर असून हा चित्रपट नक्कीच सर्व प्रेम करणाऱ्या तरुण , तरुणींना   आवडेल यात काहीच शंका नाही. प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी नवनवीन गोष्टी करून त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, हा प्रयत्न करत असताना त्यांची जी धांदल उडते ती खरी गम्मत असते, हीच धांदल,गम्मत, लाडी , गोडी , रुसवे, फुगवे आपल्याला ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हो हो जरा थांबा, इतकी घाई करू नका सांगते , हा चित्रपट कोणता, ? दिग्दर्शक? निर्माता ? इतर कलाकार मंडळी ? तर तो चित्रपट आहे “हृदयात समथिंग समथिंग”

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटाची विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांनी निर्मिती केली आहे. तर सचिन नथुराम संत ह्यांची सहनिर्मिती असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण राजा कारळे ह्यांनी केले आहे.

या चित्रपटात अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हण मुख्य भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटात अशोक  सराफ  सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे.

 

READ ALSO : TRUCKBHAR SWAPNA REVIEW

नुकताच ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटाचा फस्ट लूक सोशल मीडियावरून लाँच झाला. फस्ट लूक पोस्टर लाँच झाल्यावर चित्रपटाचे निर्माते विनोदकुमार जैन म्हणाले, “ प्रेमात पडल्यावर प्रत्येकाच्याच ‘हृदयात समथिंग समथिंग’ होतं. आयुष्यात एकदा तरी ह्या फिलींगची अनुभूती प्रत्येकानेच घेतलेली असते. तुम्ही प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तिला इम्प्रेस करता-करता काही विनोदी घटना तुमच्या आयुष्यात घडल्या तर काय धमाल येते, ह्यावर हा चित्रपट आहे.

दिग्दर्शक प्रविण राजा कारळे सिनेमाविषयी सांगतात, “ हा धमाल विनोदी कौटुंबिक चित्रपट आहे. अनिल कालेलकर ह्यांनी लिहीलेल्या संवादांमूळे तुम्ही चित्रपटभर सतत हसत राहाल, ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे. ब-याच कालावधीत मराठी फिल्म इंडस्ट्रीत असा विषय सिनेरसिकांच्या समोर आला नाही. चित्रपट प्रेमाविषयी असला तरीही कुटूंबातल्या 90 वर्षांच्या आजीपासून ते 9 वर्षांच्या मुलांपर्यंत सगळ्यांनी एकत्र बसून पाहण्यासारखा आहे.”

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट 5 ऑक्टोबर 2018ला रिलीज होणार आहे.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author