बोगदातील आई :सुहास जोशी यांच्याबद्दल थोडे काही

बोगदातील आई :सुहास जोशी  यांच्याबद्दल थोडे काही

सुहास जोशी यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात महाविद्यालयीन काळापासूनच केली. जेव्हा त्यांना त्यांची अभिनयातील रुची समजली त्यावेळी त्यांनी अभिनयात पदवी घेणायचे ठरवले आणि नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा तुन अभिनयाची पदवी घेतली. १९७२ साली खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली, ती बॅरिस्टर या मराठी नाटकाद्वारे. हे नाटक विजय मेहता यांनी दिग्दर्शित केले होते आणि जयवंत दळवी यांनी लिहिले होते. बॅरिस्टर, सख्खे शेजारी, आणि गोष्ट जन्मांतरीची हि त्यांची काही गाजलेली नाटके. सुहास जोशी यांनी मराठी चित्रपटांबरोबरच काही हिंदी चित्रपटामध्ये हि अभिनय केला. त्याचबरोबर त्या काशिनाथ घाणेकर यांच्याबरोबर आनंदी गोपाळ मध्ये होत्या. सुहास जोशी यांनी डॉ श्रीराम लागू यांच्याबरोबर सुद्धा नाटकांमध्ये अभिनय केला आहे ,त्यापैकी अग्निपंख,नटसम्राट , एकाच प्याला हि त्यांची गाजलेली नाटके. ऐंशी च्या दशकात त्यांनी डॉ श्रीराम लागू यांच्या बरोबर बरेच नाटकात अभिनय केला. सुहास जोशी यांनी गंभीर आणि विनोदी या दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारल्या आहे. मराठी चित्रपटात तू तिथं मी या चित्रपटाने त्यांना जवळपास ४ पुरस्कार मिळवून दिले.

 

READ ALSO : अजय गोगावले म्हणताहेत ‘इकडून तिकडे, तिकडून तिकडे’

मराठी सोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे चांगले नाव झाले ,त्यांनी बऱ्याच चित्रपटात अभिनय केला.

त्यापैकी तेजाब ,चांदणी ,जोश या चित्रपटांनी बरीच कमाई केली. त्यांनी त्यांचा अभिनयाची एक वेगळी छाप रसिक प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे.

काही दिवसापूर्वीच त्यांनी पुन्हा छोट्या पडद्यवर पुनरागमन केले आहे. त्यांचा छोट्या पडद्यावरील विशेष म्हणजे काही मराठी मालिका बऱ्याच गाजल्या. प्रपंच, अग्निहोत्र, कुंकू या मालिकांमध्ये त्यांची भूमिका विशेष गाजली.

स्टार प्रवाह वरील ‘ललित २०५ ‘ या मालिकेद्वारे त्या पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अभिनय करत आहे. त्यात त्यांची भूमिका हि आजीची आहे . एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित ही मालिका आहे.

नुकताच त्यांचा नवीन मराठी चित्रपट बोगदा प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटात त्यांनी  आईची भूमिका साकारली आहे. आई आणि मुलगी यांचे नाते या चित्रपटाद्वारे दाखवण्यात आलेले आहे. या चित्रपटात त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलीच्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे आहे. त्यांच्या ह्या चित्रपटात नक्कीच आपल्याला त्यांचा अभिनयाचा आणखी एक कंगोरा पाहायला मिळेल. त्यांच्या अभिनय कौशल्याने त्यांनी सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहे .

तर नक्की पाहूया बोगदा फिल्मीभोंगा मराठी सोबत

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

ललित प्रभाकरचा ‘मीडियम स्पाइसी’ व्हिडीओ

‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी...

About The Author