हे तर लईच ‘इपितर’ हे भो..

हे तर लईच ‘इपितर’ हे भो..

         “वेडी माणसंच इतिहास घडवतात आणि हे तर लईच येडे भो..” असं म्हणत, गावरान मातीतल्या संकल्पनेचं बीज असलेला तसेच बिलंदर व्यक्तिरेखेने नटलेला एक सुंदर चित्रपट ८ जून २०१८ ला आपल्या भेटीला येणार आहे… नाव आहे ‘इपितर’. इपितर म्हणजे इरसाल किंवा बिलंदर. ध्येयपुर्तीसाठी झटणाऱ्या ३ वेड्या तरुणांची हि कथा आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पोस्टरवर चित्रपटाचे नायक अनुक्रमे आइझॅक न्यूटन, अल्बर्ट आइन्सटाइन, आणि थॉमस एल्वा एडिसनच्या वेशात आपल्याला पाहायला मिळतात. या तिन्ही वैज्ञानिकांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात ‘वेडे’ म्हणून हिणवलं गेलं होतं. पण त्यांनी स्वतःला जगापुढे सिद्ध करून दाखवलं. असंच काहीसं चित्रपटाच्या नायकांविषयी या पोस्टरद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे.

या चित्रपटातील पात्रच नाहीत तर या चित्रपटाचे निर्माते-लेखक किरण बेरड हे हि खऱ्या आयुष्यात स्वप्नपूर्तीसाठी झपाटलेले आहेत. अहमदनगर जिल्ह्याच्या सोनेवाडी येथे राहणाऱ्या किरण बेरड यांचं एक छोटसं किराणामालाचं दुकान आहे. तसेच ते भाजीपाल्याची विक्री ही करतात. त्यांना लेखन आणि वाचनाची आवड होती. पण हि आवड, नुसती आवडीपुरतीच मर्यादित न ठेवता त्यांनी चित्रपटलेखन आणि चित्रपट निर्मितीसारखं शिवधनुष्य पेलायचं ठरवलं आणि आता त्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. किरण बेरड म्हणतात कि “ज्याला स्वतः मध्ये काय दडलंय??  हे कळलं की तो हिट झालाच म्हणून समजा !” किरण बेरड हे ‘तडका’ या सदराखाली अफलातून चारोळ्या लिहितात.

स्वतःच्या लिखाणातलं कसब त्यांच्या वेळीच लक्षात आल्यानेच त्यांनी ‘इपितर’ हा मराठी चित्रपट लिहिला असावा. किरण बेरड यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘मॉडेल व्हिलेज- हिवरे बाजार’ या डॉक्युमेंट्रीमध्ये अभिनेता अमीर खान काम करणार असल्याची माहिती स्वतः किरण यांनी आपल्या फेसबुकवर दिलेली आहे.

डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत इपितर सिनेमाची निर्मिती नितिन कल्हापूरे आणि किरण बेरड ह्यांनी केली आहे. तसेच सह-निर्माते आहेत, सुधीर बोरुडे, दत्ता तारडे, विकास इंगळे. या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद किरण बेरड यांचे आहेत. दत्ता तारडे दिग्दर्शित ह्या विनोदी सिनेमात भारत गणेशपुरे, मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे, जयेश चव्हाण, विजय गीते, गणेश खाडे, निकिता सुखदेव, वृंदा बाळ ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.

         लवकरच या चित्रपटाचं वरात song आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगलं कथानक, उत्तम दिग्दर्शन असलेल्या मराठी चित्रपटांच्या जंत्रीत ‘इपितर’ हा चित्रपट टिकाव धरू शेकेल का? हे पाहण्यासारखं आहे. मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडींसाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.