मराठी सिनेसृष्टी खरंच नफ्यामध्ये आहे का ???

मराठी सिनेसृष्ठी खरंच नफ्यामध्ये आहे का ???

सैराट चित्रपटाने ११० कोटींचा टप्पा गाठल्यामुळे मराठी सिनेसृष्ठीचा भाव वधारला आहे. अनेकानेक चित्रपट निर्माते मराठीत येऊ पहात आहेत. पण उद्योग म्हंटलं कि नफा-तोट्याचं मुल्यांकन करणं आलंच. कारण कोणताही व्यावसायिक नफा असल्याशिवाय कोणत्याही व्यवसायात हात घालत नाही. मग वर्षाकाठी १०० चित्रपट बनविणारी मराठी सिनेसृष्ठी खरंच नफ्यामध्ये आहे का ? हा प्रश्न कोणाच्याही मनात येणं स्वाभाविक आहे. त्या संदर्भातील काही आकडेवारीचा आढावा आपण या लेखात घेऊया.

        दशमी क्रिएशन LLPचे नितीन वैद्य यांनी गोळा केलेल्या माहिती नुसार २००५ ते २०१५ या दहा वर्षात एकूण ९८५ चित्रपट सेन्सर बोर्डाकडे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गेले. ज्यातील फक्त ५६१ चित्रपट प्रदर्शित होऊ शकले. ते ५६१ चित्रपट बनविण्यासाठी, त्यांची जाहिरात करण्यासाठी आणि ते चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आलेला एकूण खर्च होता, ६०३ कोटी रुपये. त्या ५६१ चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन झालं होतं, ४४० कोटी रुपये. म्हणजे जितके पैसे निमात्यांनी चित्रपट बनविण्यासाठी ओतले, त्याच्यापेक्षा १६६ कोटी रुपयांचा कमी व्यवसाय झाला. बरं हे सगळे ४४० कोटी रुपये निर्मात्यांना मिळत नाहीत, निर्मात्यांना त्यातले फक्त ३५ टक्के मिळतात. ४४० कोटी रुपयांमधले ३५ टक्के म्हणजे, १५४ कोटी रुपये. याचाच अर्थ ६०३ कोटी रुपये खर्च करून निमात्यांना फक्त १५४ कोटी रुपये परत मिळाले. म्हणजेच मराठी सिनेसृष्ठी २००५ ते २०१५ या १० वर्षांमध्ये ७४% नुकसानीत होती. यातील १५ ते २० % नुकसान निर्मात्यांनी मिळालेले अनुदान, satellite हक्क, संगीत हक्क आणि Digital हक्क विकून भरून काढले असावे. पण याने मराठी सिनेसृष्ठी नफ्यात येत नाही.

आता मराठी चित्रपटांचा व्यवसाय कमी होण्यामागची कारणे शोधायची झालीच तर, अनेक तज्ञ लोकांच्या मते चित्रपटांची वाढत असलेली संख्या याला बहुतांशी कारणीभूत आहे. २०१७ या एकाच वर्षी १०० मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. त्यात हिंदी चित्रपटांशी हि मराठी चित्रपटांना स्पर्धा करावी लागते. अशा वातावरणात मराठी चित्रपटांचा व्यवसाय होणं फार कठीण होऊन बसतं.

भारतीय सिनेसृष्ठी जी १४२ अब्ज रुपयांची आहे, तिथे बजेटनुसार हिंदी चित्रपटांचा वाटा ५१ % आहे तर तेलगु आणि तमिळ भाषिक चित्रपटांचा वाटा ३० % इतका आहे. उरलेल्या १९ % मध्ये इतर प्रादेशिक भाषांचे चित्रपट येतात. याचा अर्थ तेलगु-तमिळ चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपटावर अतिशय कमी खर्च केला जातो. त्यामुळे चित्रपटातील भव्यतेला मराठी प्रेक्षक मुकतात आणि ते चित्रपटाकडे पाठ फिरवतात. चित्रपट पाहायला येणाऱ्यांची संख्या रोडावल्यामुळे हि चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. PVRचे CEO अजय बिजली यांनी दिलेल्या अहवालातून असं समोर येतं कि, भारतात २०१३ साली ३४ कोटी लोक चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेले आणि २०१७ मध्ये चित्रपट पाहायला जाणाऱ्यांची संख्या कमी होऊन ती २७.५० कोटी इतकी झाली. हि आकडेवारी पूर्ण भारतीय सिनेसृष्ठीतील चित्रपटांसाठीची जरी असली तरी यावरून आपल्या लक्षात येतं कि, भारतात किती झपाट्याने प्रेक्षकसंख्या कमी होत आहे. आणि ह्याला कारण आहे नव्याने येऊ घातलेल्या Netflix, Hostar सारख्या इंटरनेट मनोरंजन सेवा. ज्यावर तुम्हाला दर्जेदार कलाकृती तर पाहायला मिळतातच, त्याचसोबत आपल्या वेळेनुसार, आपल्या सोयीनुसार सेवेचा उपभोग घेण्याचं स्वातंत्र हि मिळतं.

तात्पर्य काय तर मराठी सिनेसृष्ठीमध्ये एका-दुसऱ्या चित्रपटाचं यश पाहून, कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता पैसे गुंतवणाऱ्या निर्मात्यांसाठी या आधीचा काळ तर कठीण होताच पण येणारा भविष्यकाळ हि प्रचंड संघर्षमय असणार आहे.

         मनोरंजन विश्वामधील अशाच ताज्या घडामोडीं आणि गमती जमती जाणून घेण्यासाठी फिल्मीभोंगाला भेट देत रहा. खुश रहा..फिल्मी रहा.

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष

अमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

वैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील

'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

About The Author

Filmi Shinde

कथा, पटकथा, संवाद या तिन्ही विभागात प्राविण्य मिळवलेले सुशांत शिंदे सध्या चित्रपटलेखन, मालिकालेखन आणि डिजीटल क्षेत्रासाठी काम करत आहेत. सुशांत शिंदे याचं लेखन प्रेक्षकांना हास्य, रहस्य आणि नाट्य याच्या अद्भुत मिश्रणाने खिळवून ठेवतं. फिल्मी भोंगा या वेब पोर्टल साठी ते 'फिल्मी शिंदे' या नावाने ब्लॉग लिहितात.