विरुष्का, दीपवीर, इशानंद नंतर उडतोय ‘विकिशा’ ह्यांच्या लग्नाचा बार.. अहो पत्रिका मिळाली का तुम्हाला..?

विरुष्का, दीपवीर, इशानंद नंतर उडतोय ‘विकिशा’ ह्यांच्या लग्नाचा बार.. अहो पत्रिका मिळाली का तुम्हाला..?

 

बॉलिवूड वरून इंस्पायर्ड लग्नसोहळे ही सध्याचा ‘इन’ ट्रेंड. हॅशटॅग नवरा मुलगा आणि नवरी मुलगी ह्यांचे शॉर्टनेम्स देखील जोरदार ट्रेंड होतायत. विराट – अनुष्का नंतर दीपिका रणवीर ह्यांचं लग्न चांगलंच गाजलं. पण ज्यांच्या लग्नात हे सगळे सेलिब्रिटी वाढप्याचे काम करत होते आणि सगळ्याच भारतीयांना तोंडात बोटं घालायला लावणारे लग्न झाले ते म्हणजे इशा अंबानी आणि आनंद पिरामल ह्यांचं. त्यांच्या लग्नातल्या लग्न पत्रिकेपासून ते डोली उठे पर्यंतचे सगळे कार्यक्रम ना भूतो ना भविष्यती होते. पण ह्याच्या तोडीस तोड अजून एक लग्नाचा बार उडणार आहे लवकरच. म्हणजे लग्नाचे निमंत्रण असो की लग्नाचे स्थळ सगळंच कसं सरंजामी पद्धतीचं..!! सोप्या मराठीत एकदम लॅविष.. आणि ह्या लग्नाचं बोलावणं सगळ्यांना आहे बरं… 

 

READ ALSO :  १७ रात्रीत शूट केलेला सत्यपरिस्थितीवर आधारलेला, एक थरार चित्रपट.

कोणाचं आहे म्हणता हे लग्न..? अहो आपल्या हॅशटॅग विकिशा च म्हणजे चि. विक्रांत सरंजामे आणि ची. सौ. का. इशा निमकर ह्यांच्या लग्नाचं.. ह्या मराठमोळ्या उद्योगपतीने सुद्धा आपण अंबानीपेक्षा कुठेही कमी नाही हे दाखवून द्यायचा चँग बांधलाय बरं का..!! लग्नाची आमंत्रण पत्रिका काही लाखांची आहे म्हणे. त्यात मोती, चांदीचे करंडे, पैठणी साडी, सूट, भेटवस्तू असं बरंच काही आहे. म्हणजे एक घरी आमंत्रण करताना ५ – ६ गडी हातात निमंत्रणाची ताटं घेऊन उभे राहतात हो.. आता आमंत्रणच इतके जोरदार आहे तर पुढचे सगळे कार्यक्रम देखील अंबानींच्या तोडीस तोड असणारेत ह्यात शंकाच नाही. व्याही भोजन, चुडा भरण, मेहेंदी, संगीत, हळद, साखरपुडा, सीमांत पूजन आणि मग ग्रँड इव्हेंट म्हणजे लग्न आणि रिसेप्शन… डोळ्याचं पारणं फिटेल अशी जय्यत तयारी सरंजामे ह्यांच्या तर्फे मायरा करतच आहे. 

लग्नाचे स्थळ सुद्धा खूप निसर्गरम्य आहे. पुण्याच्या जवळ कॉन्टेसे रिसॉर्ट ह्यांच्या लग्नासाठी बुक झाले आहे. येणाऱ्या पाहुण्यांसाठी ये जा करायला घरचंच हेलिकॉप्टर आहे. दिमतीला सेवक आहेतच. काही हवं नको बघायला ‘झेंडे’ राब राब राबतायत. तरीही निमकरांना कमीपणा वागू नये म्हणून हा साधाच लग्न सोहळा आहे हो..!! आता हा साधा तर सरंजामी लग्न सोहळा अंबानींना पुरून उरला असता नाही का..? पण असो कोणत्याही मराठी मालिकेत असा क्षण, असे लग्न आता पर्यंत तरी झाले नाही. तुला पाहते रे ची संपूर्ण टीम हा सोहळा प्रेक्षकांच्या मनात कोरला जावं ह्या साठी खूप मेहनत घेत आहे. रोज बनणाऱ्या मिम्स मधून तावून सुलाखून ‘तुपारे’ चे कलाकार अजूनही जोमाने काम करत आहेत. ह्या सरंजामे – निमकर लग्न सोहळ्याचं प्रक्षेपण तुम्हालाही पहायला मिळणार आहे. तर येत्या १३ जानेवारीची संध्याकाळ विकिशा के नाम.. तब्बल २ तास हा स्पेशल एपिसोड तुमच्यासाठी खास आणला आहे झी वाहिनीने.. तर मग मंडळी तुम्हीही सामील व्हा ह्या मराठमोळ्या भव्य दिव्य लग्न सोहळ्यात आणि द्या तुमचे आशीर्वाद #विकिशाला..!!

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण?

पळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी

मला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ).  'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री

पळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळ

सोशल मिडियावर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ चा धुमाकूळबऱ्याच दिवसांपासून नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचं तुमच्या कानी आलं असेल. गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दल देखील तुम्ही बरंच काही ऐकून असाल. नचिकेतच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून...

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट

छत्रपतींचे महापराक्रमी योद्धा ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच दिमाखात संपन्नशिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य...

About The Author